Mumbai News: मुंबई, : मुंबई महानगरपालिकेतील (BMC) वादग्रस्त अधिकारी महेश पाटील पुन्हा एकदा गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. बॉलिवूड अभिनेता Javed Jaffrey यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांनी तब्बल 16.24 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करत खार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी महेश पाटील यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे वर्ग करण्यात आला आहे.Mumbai News:

या प्रकरणामुळे BMC प्रशासनातील ‘अदृश्य नेटवर्क’ आणि काही अधिकाऱ्यांच्या कथित राजकीय पाठबळावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण याच महेश पाटील यांच्यावर याआधी खंडणी आणि मारहाण प्रकरणात गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले; मात्र काही महिन्यांतच ते पुन्हा महत्त्वाच्या पदावर रुजू झाले. त्यामुळे “BMCमध्ये कारवाई होते की फक्त फाईल हलवली जाते?” असा सवाल आता पुन्हा उपस्थित केला जात आहे. Mumbai News:

तक्रारीनुसार, वांद्रे पश्चिम येथील पुनर्विकास प्रकल्पात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूक उभी करण्यात आली. “सरकारी स्तरावर सर्व क्लिअर आहे” असा विश्वास देत आरोपींनी प्रकल्प सुरक्षित असल्याचे सांगितले. सरकारी कागदपत्रे दाखवून विश्वास संपादन करण्यात आला आणि त्यानंतर चेक, रोख रक्कम, विदेशी चलन आणि महागड्या घड्याळांच्या स्वरूपात तब्बल 16 कोटींपेक्षा अधिक रक्कम उभी करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र पैसे घेतल्यानंतर ना घरे मिळाली, ना गुंतवणुकीवर परतावा. अखेर फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर जाफरी कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. Mumbai News:
या प्रकरणात व्यावसायिक निशीत पटेल याचे नाव पुन्हा समोर आले आहे. विशेष म्हणजे, 2025 मध्ये महेश पाटील यांच्यावर खंडणीसाठी मारहाण केल्याचा आरोप करणारे हेच निशीत पटेल आता या कथित फसवणूक प्रकरणात सहआरोपी ठरले आहेत. मुंबई गुन्हे शाखेने त्याला अटक केली असून, आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Mumbai News:
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकल्पात केवळ जाफरी कुटुंबीयांनीच नव्हे तर काही निवृत्त पोलीस अधिकारी, BMC अधिकारी, कलाकार आणि निवृत्त न्यायाधीशांनीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे मोठे प्रशासकीय आणि राजकीय पाठबळ होते का, याचीही चौकशी सुरू झाली आहे. Mumbai News:
28 नोव्हेंबर 2025 रोजी महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने कठोर कारवाईचा दावा केला होता. मात्र काही काळातच त्यांची पुन्हा के-साऊथ वॉर्डसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे “वादग्रस्त अधिकाऱ्यांना संरक्षण कोण देतं?” हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. Mumbai News:
दरम्यान, या हाय-प्रोफाईल प्रकरणात मुंबई पोलिसांचा तपास आता वेगाने सुरू असून, या कथित फसवणूक रॅकेटमागील मोठी नावे समोर येतात का, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे. Mumbai News:







