Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 15 May 2026, 17:20

Mawal Land Scam पुणे, ता. १५ : मावळ तालुक्यात महसूल विभाग, नोंदणी कार्यालय आणि जमीन व्यवहार क्षेत्राला हादरवून सोडणारा मोठा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. ‘भोगवटादार वर्ग-२’मधील कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचा सातबारा बनावट शासकीय आदेशांच्या आधारे उघडून खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, अनेक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Mawal Land Scam

याप्रकरणी मंडळ अधिकारी सचिन कोकाटे यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीष वसंत वाकडे (रा. वारजे, पुणे), विनोद भिमाजी डफळ (रा. राधिका अपार्टमेट वडगाव बु,ता हवेली जि पुणे), समिर सदानंद काढगे (रा. लोखंडवाला सर्कल, न्यू म्हाडा, आझादनगर मुंबई), प्रियदशनी धोंडिराम शिंदे (रा.प्लाट नं55, बळवंत को ऑप हौसि, बळवंतनगर कोल्हापूर), समिर शिवशकर लोहकरे व स्मिता शिवशकर (दोघेही रा. प्लाट नं 47 ए बोरवली, 403, चौथा मजला गोराई सिद्धार्थ, बोरवली वेस्ट मुंबई) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mawal Land Scam

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे मोरवे (ता. मावळ) येथील गट क्रमांक ३६१ मधील तब्बल ९ हेक्टर ५४ आर जमीन ही ‘भोगवटादार वर्ग-२’ प्रकारातील असल्याने तिची थेट विक्री करण्यास निर्बंध आहेत. अशा जमिनीच्या व्यवहारासाठी शासन आणि महसूल विभागाची विशेष परवानगी आवश्यक असते. मात्र, आरोपींनी उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी कार्यालयाच्या नावाने बनावट आदेश तयार करून बंद असलेला सातबारा उघडला आहे.

 

तपासादरम्यान आदेश क्रमांक एनए/एसआर/२५६/२०२२ दिनांक ८ सप्टेंबर २०२२ हा आदेश बनावट असल्याचे उघड झाले. याच आदेशाचा आधार घेत दुय्यम निबंधक कार्यालय, वडगाव मावळ येथे २०२३ मध्ये खरेदी दस्त नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. १ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबर २०२३ रोजी चार खरेदी दस्त नोंदवण्यात आले. त्यानंतर फेरफार क्रमांक १८५२, १८५३, १८५४ आणि १८५५ मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे, हे फेरफार महसूल अधिकाऱ्यांनी मंजूरही केले होते. Mawal Land Scam

संबंधित आदेश खरे असल्याचा समज करून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी फेरफार मंजूर केले. मात्र नंतर पडताळणीदरम्यान आदेशच बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या व्यवहारांमध्ये कुल मुखत्यारधारक म्हणून मनीष वसंत वाकडे आणि विनोद भिमाजी डफळ यांची नावे समोर आली आहेत. त्यांनी बनावट आदेशांच्या आधारे जमीन व्यवहार केल्याचे समोर आले आहे. याशिवाय काही खरेदीदारांची नावेही व्यवहारात समोर आली असून, संपूर्ण व्यवहार साखळीची चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. Mawal Land Scam

महसूल विभागात खळबळ
मोरवे परिसर हा मावळमधील वेगाने विकसित होणारा भाग मानला जातो. त्यामुळे येथील जमिनींचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांत असल्याचे बोलले जाते. बनावट आदेशांच्या आधारे जमीन व्यवहार करून मोठा आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न झाला का, याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे महसूल विभाग, तलाठी कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बनावट आदेशांच्या आधारे सातबारा उघडण्यापासून ते दस्त नोंदणीपर्यंतची प्रक्रिया कोणाच्या आशीर्वादाने पार पडली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. Mawal Land Scam

दरम्यान, या प्रकरणात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, शासनाची दिशाभूल करणे आणि संगनमताने जमीन व्यवहार केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. Mawal Land Scam

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36
Next Post

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.