Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 15 May 2026, 17:47

BIG BREAKING NEWS दौंड, ता. १५ : दौंड तालुक्यात सध्या राजकारण, सहकार आणि साखर क्षेत्रात एका प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दौंड दौऱ्यात अचानक उपस्थित केलेल्या “हा बोत्रे कोण आहे?” या प्रश्नामुळे तालुक्यात तर्क-वितर्कांना अक्षरशः उधाण आले आहे. तर राज्याच्या साखर उद्योगात खळबळ उडाली आहे. BIG BREAKING NEWS

दौंड तालुक्याच्या माजी आमदार स्वर्गीय उषादेवी कृष्णराव जगदाळे (पाटील) यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी पत्नी प्रतिभाताईंसह जगदाळे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्यांनी उषादेवी यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबीयांशी जवळपास अर्धा तास संवाद साधला. मात्र या चर्चेदरम्यान पवार यांनी तालुक्यातील ऊस शेती, साखर कारखाने आणि गुऱ्हाळ व्यवसायाबाबत माहिती घेत असतानाच अचानक “हा बोत्रे कोण आहे?” असा सवाल उपस्थित केल्याची माहिती समोर आली आहे. BIG BREAKING NEWS

प्रश्न पडताच उपस्थितांमध्ये शांतता
पवारांच्या या प्रश्नानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये काही काळ शांतता पसरल्याचे सांगितले जात आहे. संबंधित व्यक्तीबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली असून, अल्पावधीत साखर उद्योगात निर्माण झालेला प्रभाव हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. राजकीय वर्तुळात या प्रश्नाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. दौंड तालुक्यातील बदलती साखर राजकारणाची समीकरणे, नव्याने उदयास येणाऱ्या आर्थिक शक्ती आणि आगामी राजकीय हालचाली यांचा संदर्भ या प्रश्नाशी जोडला जात आहे. BIG BREAKING NEWS

 

बाबूराव बोत्रे पाटील कोण?
चर्चेत असलेले बाबूराव बोत्रे पाटील हे महाराष्ट्रातील उदयोन्मुख साखर उद्योजक म्हणून ओळखले जातात. बाबूराव बोत्रे पाटील हे ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असून, अल्पावधीत अनेक बंद पडलेले साखर कारखाने चालवून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावा केला जातो. मूळचे पुणे-शिरूर परिसरातील असलेल्या बोत्रे पाटील यांचे नाव सध्या सोलापूरच्या ओंकार शुगर ग्रुपमुळे राज्यभर चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या समूहाकडून १७ हून अधिक साखर कारखाने चालवले जात असल्याची चर्चा आहे. BIG BREAKING NEWS

पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
राजकीय जाणकारांच्या मते, शरद पवार यांचा कोणताही प्रश्न हा सहजासहजी नसतो. साखर सहकार क्षेत्रातील बदलती ताकद, नव्या नेतृत्वाचा उदय आणि आर्थिक समीकरणांवर त्यांची बारीक नजर असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे. दौंड तालुक्यात आता एकच चर्चा रंगली आहे. “पवारांचा हा प्रश्न केवळ कुतूहल होता की एखादा राजकीय टोला?” विशेषतः बाबूराव बोत्रे पाटील यांचे वाढते साखर साम्राज्य आणि त्यांचा वाढता प्रभाव लक्षात घेता, हा अप्रत्यक्ष संदेश तर नव्हता ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. BIG BREAKING NEWS

दरम्यान, “हा बोत्रे कोण आहे?” हा प्रश्न आता दौंडच्या साखर राजकारणातील आगामी घडामोडींचा संकेत मानला जात असून, येत्या काळात या चर्चेला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. BIG BREAKING NEWS

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

21 वर्षांचं नातं अन् दुसरं लग्न! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यावर आरोप; पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत घुसून अंगावर पेट्रोल ओतलं अन्

Tuesday, 28 July 2026, 8:44

नापास झाला अन् परीक्षा पुन्हा घ्यावी म्हणून रचला पेपरफुटीचा बनाव; MPSC पेपरफुटीचा दावा ठरला खोटा

Tuesday, 28 July 2026, 8:19

पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा कहर वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 28 July 2026, 7:56

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी लकी? ‘या’ 5 राशींना आर्थिक लाभाचे जोरदार योग

Tuesday, 28 July 2026, 7:36

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14
Next Post

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.