Hadapsar Bomb Case : पुणे : हडपसर येथील उषा किरण हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बसदृश्य वस्तूप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात कोणताही दहशतवादी अँगल नसून, हॉस्पिटलकडून मोठे उपचार बिल आकारण्यात आल्याच्या रागातून आरोपीने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून डमी बॉम्ब तयार केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. Hadapsar Bomb Case

या प्रकरणातील आरोपी शिवाजी राठोड (वय ३०, रा. मांजरी, मूळ रा. सोलापूर) याला एटीएसने नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. राठोड याचे मांजरी येथे चप्पल-बुट विक्रीचे दुकान असून त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे तपासात समोर आले आहे. Hadapsar Bomb Case
पोलीसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीच्या नातेवाईकांसह १५ ते १७ जणांची चौकशी केली. त्यानंतर काळेपडळ, हडपसर आणि मांजरी परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. आरोपीच्या घरातून आणि दुकानातून ऑनलाईन मागवलेले डिजिटल घड्याळाचे किट, पाईप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. Hadapsar Bomb Case
तपासादरम्यान आरोपी नागपूरकडे रेल्वेने पळाल्याचे स्पष्ट झाले. अकोला आणि मुर्तिजापूर येथे त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, मात्र अखेरीस नागपूर रेल्वे स्टेशनवर एटीएसने त्याला अटक केली. Hadapsar Bomb Case
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी १० तारखेला उपचारासाठी उषा किरण हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यावेळी त्याला मोठा वैद्यकीय खर्च सांगण्यात आला होता. त्यानंतर त्याने यूट्यूबवरून माहिती घेऊन डमी बॉम्ब तयार केला. या वस्तूमध्ये कोणतेही स्फोटक आढळले नसून, फॉरेन्सिक तपासणीसाठी त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. Hadapsar Bomb Case
हॉस्पिटलला आधी फोन करून बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देणे आणि नंतर हॉस्पिटल उडवून देण्याची भीती दाखवून खंडणी उकळण्याचा आरोपीचा उद्देश असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीला पुण्यात आणल्यानंतर अधिक चौकशीत संपूर्ण कट उघड होण्याची शक्यता आहे. Hadapsar Bomb Case







