Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नापास झाला अन् परीक्षा पुन्हा घ्यावी म्हणून रचला पेपरफुटीचा बनाव; MPSC पेपरफुटीचा दावा ठरला खोटा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 28 July 2026, 8:19

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि राजकीय स्तरावर पेपरफुटीची जोरदार चर्चा सुरू होती. परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात आला होता. या आरोपांची गंभीर दखल घेत आयोगाने तातडीने चौकशी केली. तपास पूर्ण झाल्यानंतर पेपरफुटीचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागातील गट-ब संवर्गातील 154 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या पदांसाठी 22 मार्च 2026 रोजी राज्यातील 6 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 12 जून 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. पुढे 22 जुलै 2026 रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली.

दरम्यान, गौरव पाटील नावाच्या व्यक्तीने 21 जुलै रोजी एमपीएससीला ई-मेल पाठवून प्रश्नपत्रिका 20 मार्चलाच बाहेर आल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर आयोगाने संबंधित बाबींची सखोल चौकशी केली. तपासादरम्यान व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्ष परीक्षेत विचारण्यात आलेली प्रश्नपत्रिका यांचा कोणताही संबंध नसल्याचे समोर आले.

चौकशीत आणखी एक महत्त्वाची बाब उघड झाली. तक्रार करणारी व्यक्ती या भरती परीक्षेत अपयशी ठरली होती. परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, या उद्देशाने पेपरफुटीचा खोटा दावा करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले.

 

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर फिरणारी प्रश्नपत्रिका ही मूळ प्रश्नपत्रिका नसून पेपरफुटीचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. आयोगाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

या प्रकरणात चुकीची माहिती पसरवून आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही आयोगाने दिली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हडपसरमधील अनिल पवार हत्या प्रकरणाचा महत्वपूर्ण निकाल; आरोपी बापू बाबरला जन्मठेप

Monday, 19 October 2026, 22:17

छत्रपती कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीपूर्वी दिलासा! पहिला हप्ता ३,५०१ रुपये प्रतिटन; संचालक मंडळाचा निर्णय

Monday, 19 October 2026, 21:50

उरुळी कांचन येथील 10 महिन्यांच्या ‘विवान’चा विश्वविक्रम! फ्लॅशकार्डवरून ओळखले 22 वाहनांचे लोगो

Monday, 19 October 2026, 20:23

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांनी मारली एकहाती बाजी; महायुतीचा पराभव

Monday, 19 October 2026, 19:51

भाकरी महागणार! महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला; नवीन दर काय?

Monday, 19 October 2026, 19:25

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17
Next Post

21 वर्षांचं नातं अन् दुसरं लग्न! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यावर आरोप; पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत घुसून अंगावर पेट्रोल ओतलं अन्

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp