दीपक खिलारे
इंदापूर : Indapur News : मुख्यमंत्री Chief Minister एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री Deputy Chief Minister, देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील युती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन राज्यात काम करीत आहेत. वीरश्री मालोजीराजेंच्या गढीचे संवर्धन, स्मारक करण्यासंदर्भात (conservation-of-veerashree-malojirajs) शिवसेना-भाजपचे सरकार (shivsena-bjp-government) निधी कमी पडू देणार नाही. (not-let-the-funds) असे इंदापूर (Indapur) तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अँड. शरद जामदार (sharad-jamdar) यांनी सांगितले. (Indapur News)
वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे शिवसेना-भाजप युती सरकार संवर्धन करणार
इंदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे शिवसेना-भाजप युती सरकार संवर्धन करणार आहे, अशी घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवारी विधिमंडळामध्ये केली. शिवसेना-भाजप युती सरकारने मालोजीराजेंच्या गढीचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल इंदापूर भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Former Minister Harsh Vardhan Patil )यांचे अभिनंदन केले आहे
अँड.जामदार म्हणाले, ”इंदापूर येथे मालोजीराजे यांच्या गढीचे संवर्धन होऊन तेथे स्मारक व्हावे, या संदर्भात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाग्यश्री बंगला येथे शिवप्रेमींची दहा दिवसांपूर्वी (मंगळवारी ता. 7) बैठक घेतली होती. या बैठकीत राज्यामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्याने आता गढीचे संवर्धन व स्मारक करणेचा विषय मार्गी लागणार असून, कामांसाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी लागेल, असे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले. तसेच शिष्टमंडळ घेऊन सांस्कृतिक व इतर मंत्र्यांना भेटण्याचे व मंत्र्यांसमवेत बैठक लावण्याचे यावेळी बैठकीत ठरविण्यात आले. सदर बैठकीला मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.”
मंत्रालयामध्ये गुरुवारी (ता.9 मार्च ) पाटील यांनी मुनगंटीवार यांची भेट घेऊन शिवसेना-भाजप युती सरकार कडून गढीचे संवर्धन, मालोजीराजांचे स्मारक उभारणे, ऐतिहासिक विविध ठिकाणांचे संगोपन करणे, रामेश्वर नाका, भार्गवराम तलाव सुधारणा करणे, जुनी ऐतिहासिक शिल्पे संरक्षित करणे या विषयांवर सविस्तर चर्चा केली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मालोजीराजेंच्या गढीचे संवर्धन करणे व त्यासाठी निधी देणेस शिवसेना-भाजप युती सरकार कटिबद्ध असल्याचे मुनगंटीवार यांनी पाटील यांच्या चर्चेत नमूद केले होते. त्यामुळे पाटील यांच्या प्रयत्नामुळे गढीचे संवर्धनासाठी निधी मिळाल्याचे जामदार यांनी सांगितले.