Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

त्यांचा ‘जुगारी’ डाव अन् पोलिसांचा छापा! वरवंडमधील ‘त्या’ लिंबाच्या झाडाखाली रंगायचा खेळ; 9 जणांना अटक

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 June 2026, 17:17

यवत, ता. ४ : वरवंड (ता. दौंड) येथील पाटील मळा परिसरात लिंबाच्या झाडाखाली खुलेआम सुरू असलेल्या ‘तीन पत्ती’ जुगार अड्ड्यावर यवत पोलिसांनी बुधवारी (ता.3) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धाड टाकून ९ जणांना ताब्यात घेतले. तर एक जुगारी पोलिसांना चकवा देत ऊसाच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी झाला. या कारवाईत रोख रक्कम, पत्ते आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पांडुरंग सोपान दिवेकर (७२), संदीप भगवान रणधीर (५१), मल्हारी किसन दिवेकर (६०), गजानन वसंत माने (६०), इक्बाल रमजान शेख (६३), गुलाबराव बयाजी फरगडे (७९), सुरेश जनार्धन शिंदे (६२), श्रीकांत अशोक जगताप (३४) आणि अमोल सुभाष भोसले (३५) यांचा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर भाऊसाहेब रामराव पवार हा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस पोलीस दुरक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना वरवंड गावातील पाटील मळा येथे काही जण पैशांचा हार-जीत लावून ‘तीन पत्ती’ जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.

दुपारी साडेएकच्या सुमारास टाकलेल्या या धाडीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोलाकार बसून जुगार खेळणारे इसम आढळून आले. पोलिसांनी कारवाई सुरू करताच एक जण ऊसाच्या शेतात पळून गेला. मात्र उर्वरित नऊ जणांना जागीच पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये पांडुरंग दिवेकर, संदीप रणधीर, मल्हारी दिवेकर, गजानन माने, इक्बाल शेख, गुलाबराव फरगडे, सुरेश शिंदे, श्रीकांत जगताप आणि अमोल भोसले यांचा समावेश आहे. तर भाऊसाहेब पवार हा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे.

 

या छाप्यात आरोपींच्या समोर ठेवलेली रोख रक्कम, खेळात वापरलेले पत्ते आणि जुगाराचे इतर साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, आरोपींमध्ये काही ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार मोहन कोकरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम १२ (अ) अंतर्गत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वरवंड परिसरात सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इनर रिंगरोडआधी ‘डीपी’ करा! आराखड्याविना भूसंपादन कशासाठी? पूर्व हवेलीतील ग्रामस्थ, व्यावसायिकांचा सवाल

Thursday, 3 September 2026, 9:03

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ? ऑगस्टमध्ये आढळले 31 रुग्ण; नागरिकांची चिंता वाढली

Thursday, 3 September 2026, 8:59

अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; होर्मुझमध्ये तणाव, हुतींकडूनही क्षेपणास्त्र हल्ले

Thursday, 3 September 2026, 8:46

पाणी प्यायले, सलाईनही लावलं! प्रसाद लाड भेटले अन् जरांगेंनी उपोषण…; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 3 September 2026, 8:34

दहीहंडीच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स केला तर थेट कारवाई! पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मंडळांना इशारा

Thursday, 3 September 2026, 8:21

रीलस्टार संतोष पंडित यांच्यावर मध्यरात्री कारवाई! चंद्रकांत पाटील यांच्यावरील व्हिडिओ भोवला?

Thursday, 3 September 2026, 8:08
Next Post

वजन कमी करण्यासाठी आहाराचे योग्य नियोजन; 'हे' उपाय ठरतील फायदेशीर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp