Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ? ऑगस्टमध्ये आढळले 31 रुग्ण; नागरिकांची चिंता वाढली

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 3 September 2026, 8:59

पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सव आणि सणासुदीची लगबग सुरू असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातून आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जानेवारीमध्ये 1, जुलैमध्ये 5 तर ऑगस्ट महिन्यात तब्बल 31 रुग्ण आढळले आहेत. सध्या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठा, सार्वजनिक कार्यक्रम आणि इतर ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, गरज असल्यास मास्कचा वापर करावा आणि वारंवार हात स्वच्छ धुवावेत, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

स्वाईन फ्लू हा H1N1 विषाणूमुळे होणारा श्वसनाशी संबंधित संसर्ग आहे. संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांमुळे त्याचा प्रसार होऊ शकतो. दूषित वस्तूला स्पर्श केल्यानंतर नाक, तोंड किंवा डोळ्यांना हात लावल्यानेही संसर्ग होण्याची शक्यता असते.

सर्दी, ताप, घसा खवखवणे, खोकला, नाक वाहणे, डोकेदुखी आणि थकवा ही सामान्य लक्षणे दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास किंवा न्यूमोनियासारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मधुमेह, हृदयविकार, श्वसनाचे आजार किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनाचा परिणाम? सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Thursday, 3 September 2026, 10:00

Pune: बहिणींशी बोलत नव्हती म्हणून पत्नीला संपवलं; फरार पतीनेही केली आत्महत्या

Thursday, 3 September 2026, 9:54

इनर रिंगरोडआधी ‘डीपी’ करा! आराखड्याविना भूसंपादन कशासाठी? पूर्व हवेलीतील ग्रामस्थ, व्यावसायिकांचा सवाल

Thursday, 3 September 2026, 9:03

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ? ऑगस्टमध्ये आढळले 31 रुग्ण; नागरिकांची चिंता वाढली

Thursday, 3 September 2026, 8:59

अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; होर्मुझमध्ये तणाव, हुतींकडूनही क्षेपणास्त्र हल्ले

Thursday, 3 September 2026, 8:46

पाणी प्यायले, सलाईनही लावलं! प्रसाद लाड भेटले अन् जरांगेंनी उपोषण…; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 3 September 2026, 8:34
Next Post

इनर रिंगरोडआधी ‘डीपी’ करा! आराखड्याविना भूसंपादन कशासाठी? पूर्व हवेलीतील ग्रामस्थ, व्यावसायिकांचा सवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp