Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इनर रिंगरोडआधी ‘डीपी’ करा! आराखड्याविना भूसंपादन कशासाठी? पूर्व हवेलीतील ग्रामस्थ, व्यावसायिकांचा सवाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 3 September 2026, 9:03

डॉ. अशोक बालगुडे

पुणे: पुणे इनर रिंगरोडच्या भूसंपादनाला वेग आला असला, तरी पूर्व हवेलीतील गावांचा विकास आराखडा (डीपी) अद्याप निश्चित नसल्याने ग्रामस्थ आणि व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता आहे. रस्ता नेमका कुठून जाणार, कोणाची जमीन बाधित होणार आणि कुठे आरक्षण पडणार, याची स्पष्टता नसताना भूसंपादन कशाच्या आधारे? असा सवाल उपस्थित करीत आधी विकास आराखडा निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित ८३ किलोमीटरच्या इनर रिंगरोडसाठी सुमारे ७३५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. पीएमआरडीए हद्दीतील २१ गावांतून ३९.२२ किलोमीटर, तर पुणे महापालिका हद्दीतील २१ गावांतून ३९.२७ किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे.

पूर्व हवेलीतील उरळी कांचन आणि फुरसुंगी नगरपरिषद हद्दीतून ४.६३ किलोमीटरचा रस्ता जाणार आहे. मात्र, या परिसराचा विकास आराखडा निश्चित नसल्याने जमीनधारक, रहिवासी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज बांधकामाला परवानगी मिळाली, तर उद्या रिंगरोड किंवा आरक्षणामुळे ते बाधित होणार नाही, याची हमी कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

विकास आराखडा आणि रस्त्याची अंतिम आखणी स्पष्ट नसल्याने जमीन व्यवहार, बांधकाम परवानग्या आणि भविष्यातील गुंतवणुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘आधी नियोजन, मग भूसंपादन’ अशी स्पष्ट भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

पहिल्या टप्प्यासाठी ४४ कोटी

पहिल्या टप्प्यात खेड तालुक्यातील सोळू तसेच हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे आणि निरगुडी येथे भूसंपादन होणार आहे. यासाठी मोबदल्यापोटी पीएमआरडीएने ४४ कोटी रुपये पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहेत. भूसंपादनाचे दर निश्चित झाले असून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. २६) कार्यालयामार्फत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

रिंगरोड विकासासाठी आहे; मात्र आराखड्याविना भूसंपादन करून स्थानिकांच्या भवितव्याला अनिश्चिततेच्या कचाट्यात टाकू नये, अशी मागणी ग्रामस्थ आणि व्यावसायिकांची आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनाचा परिणाम? सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Thursday, 3 September 2026, 10:00

Pune: बहिणींशी बोलत नव्हती म्हणून पत्नीला संपवलं; फरार पतीनेही केली आत्महत्या

Thursday, 3 September 2026, 9:54

इनर रिंगरोडआधी ‘डीपी’ करा! आराखड्याविना भूसंपादन कशासाठी? पूर्व हवेलीतील ग्रामस्थ, व्यावसायिकांचा सवाल

Thursday, 3 September 2026, 9:03

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ? ऑगस्टमध्ये आढळले 31 रुग्ण; नागरिकांची चिंता वाढली

Thursday, 3 September 2026, 8:59

अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; होर्मुझमध्ये तणाव, हुतींकडूनही क्षेपणास्त्र हल्ले

Thursday, 3 September 2026, 8:46

पाणी प्यायले, सलाईनही लावलं! प्रसाद लाड भेटले अन् जरांगेंनी उपोषण…; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 3 September 2026, 8:34
Next Post

Pune: बहिणींशी बोलत नव्हती म्हणून पत्नीला संपवलं; फरार पतीनेही केली आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp