Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खडकवासलातून विसर्ग नसतानाही मुळा-मुठा दुथडी भरून वाहिली; हवेली प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 6 July 2026, 19:17

लोणी काळभोर, ता. ६ : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीला मोठा पूर आला असून, विशेष म्हणजे खडकवासला धरणातून कोणताही पाण्याचा विसर्ग न करता देखील नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. शहरातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देत हवेली तहसील प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

हवेलीच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी सांगितले की, पूरपरिस्थिती लक्षात घेऊन तहसील प्रशासन, पोलीस विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.

मंडल अधिकारी, तलाठी तसेच संबंधित यंत्रणांना पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने मुंढवा, केशवनगर, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, थेऊर, कोरेगाव मूळ, भवरापूर, अष्टापूर तसेच इतर नदीकाठच्या गावांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणीत पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते.

दरम्यान, नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने मांजरी येथील नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच लोणी काळभोर-राजबाग येथील विश्वराज बंधाऱ्यावरून तब्बल दोन मीटरपेक्षा अधिक उंचीने पाणी वाहत असल्याने परिसरात सतर्कतेचे वातावरण आहे. नदीकाठच्या नागरिकांना अनावश्यकपणे नदीपात्राजवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

अनेक वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मैलायुक्त पाण्यामुळे गटारगंगेचे स्वरूप आलेल्या मुळा-मुठा नदीने मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दुथडी भरून वाहणारे रौद्र, पण नयनरम्य रूप धारण केले आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लोणी काळभोरसह पंचक्रोशीतील नागरिकांनी नदीकाठ आणि विश्वराज बंधाऱ्यावर मोठी गर्दी केली होती. मात्र, वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
Next Post

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.