Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 22:55

बारामती : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी जबरी चोरीच्या घटनांचा तपास करत मोठी कारवाई केली आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून दोन मोटारसायकली आणि चोरीतील सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण आणि सातारा जिल्ह्यातील जबरी चोरीचे तब्बल १० गुन्हे उघडकीस आले आहेत.

६ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास कानाडवाडी ते वाकी रस्त्यावरील शेतात काम करणाऱ्या स्वाती हणुमंत टकले या महिलेच्या गळ्याला दुखापत करून मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळ्यातील मनी आणि डोरले असा सुमारे ६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला होता. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची माहिती मिळवली. त्यानुसार राज मिथुन शिंदे, सनि रमण भोसले आणि पवन सॅन्डल काळे यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत संबंधित गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक तपासात या आरोपींनी यवत, जेजुरी, बारामती शहर, वालचंदनगर, लोणंद आणि फलटण परिसरातही जबरी चोरी केल्याचे समोर आले. चोरीतील सोन्याचे दागिने बापुराव भानुदास चोपडे याच्याकडे दिल्यानंतर त्याने ते प्रविण ज्ञानेश्वर वेदपाठक याला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

 

या कारवाईत वडगाव निंबाळकर, जेजुरी, वालचंदनगर, यवत, बारामती शहर, फलटण शहर आणि लोणंद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १० जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

या प्रकरणात राज मिथुन शिंदे, सनि रमण भोसले, बापुराव भानुदास चोपडे आणि प्रविण ज्ञानेश्वर वेदपाठक यांना अटक करण्यात आली आहे. तर पवन सॅन्डल काळे हा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या कारवाईत दोन मोटारसायकली आणि जबरी चोरीतील सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, आबा जाधव, नरेंद्र यादव, धनंजय भोसले, हृदयनाथ देवकर, सूरज धोत्रे आणि भाउसाहेब मारकड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते करीत आहेत. फरार आरोपी पवन सॅन्डल काळे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.