डॉ. अशोक बालगुडे

पुणे : केदारेश्वर गुजर प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘केडीपी कराओके गायन स्पर्धा सिझन-५’मध्ये मानवतावादी समाज सेवा संघटनेचे आजीव सदस्य हिरालाल पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘केडीपी सिंगिंग आयडॉल’चा किताब मिळविला.

चिखली येथील पीसीएमसी टाऊनहॉलमध्ये रविवारी (दि. ९) ही स्पर्धा झाली. पुणे, मुंबई, सुरत, शहादा, नंदुरबार व छत्रपती संभाजीनगर येथील गुजर समाजातील २५ गायकांनी सहभाग घेतला. पहिल्या फेरीतून दहा गायकांची निवड करण्यात आली. त्यातून अंतिम पाच विजेत्यांची निवड झाली.

पाटील यांना ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. भरतभाई पुरुषोत्तम पाटील (शहादा) यांनी द्वितीय, श्रीकृष्णभाई पाटील (मुंबई) यांनी तृतीय, प्रकाशभाई फकिरा पाटील (म्हसावद) यांनी चतुर्थ, तर जयेशभाई पाटील (शहादा) यांनी पाचवा क्रमांक मिळविला.
पार्श्वगायक डॉ. राजेंद्र दीक्षित, संगीततज्ज्ञ गोविंद कुलकर्णी, चंद्रशेखर चव्हाण, उद्योजक रविंद्र पाटील, अलका पाटील आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. अंबालाल पाटील यांनी आभार मानले. समाज सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गफ्फार इस्माईल खान व सचिव अशोक दामोदर जाधव यांनी हिरालाल पाटील यांचे अभिनंदन केले.







