डॉ. अशोक बालगुडे

पुणे : “अभ्यासक्रमातील पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची सवय लावून घ्यावी. वाचनामुळे ज्ञान, विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक उपयोग करावा,” असे आवाहन प्राचार्य एस. एस. कांदे यांनी केले.

कोंढवा-येवलेवाडी येथील ट्रिनिटी पॉलिटेक्निकमध्ये ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले. क्राफ्ट बुक उपक्रमातील विजेती अन्झा सुंडके हिचा गौरव करण्यात आला.

प्रा. आशिष मोडक यांनी तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तके, ई-बुक्स, डिजिटल ग्रंथालय आणि ऑनलाइन माहितीचे स्रोत उपलब्ध असले तरी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासणे गरजेचे असल्याचे सांगितले.
संस्थेचे संस्थापक कल्याणराव जाधव, संकुल संचालक समीर कल्ला व समन्वयक प्रा. भाग्यश्री कुमकर यांचे सहकार्य लाभले. प्रा. प्रतीक्षा जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. अंकिता सूर्यवंशी यांनी आभार मानले.







