डॉ. अशोक बालगुडे

पुणे, ता, 13 : मांजरी बु.।।, मोरेवस्ती येथील तुपे पार्कसमोरील रस्त्यावर मुरूम व खडी टाकून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याने परिसरातील नागरिक व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि खराब झालेला भाग दुरुस्त झाल्यामुळे वाहतूक अधिक सुलभ झाली आहे. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी पत्रकार डॉ. अशोक बालगुडे आणि पत्रकार तुकाराम गोडसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त कुणालकुमार धुमाळ व अभियंता सोमनाथ वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठेकेदार किरण कुमावत यांच्या देखरेखीखाली मुकादम पिंटू चव्हाण यांनी रस्त्याचे काम पूर्ण केले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरूम व खडी टाकून खराब झालेला भाग समतल करण्यात आला. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची होणारी गैरसोय कमी झाली आहे.

या परिसरात नागरिकांची तसेच वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्ता खराब असल्याने विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणी येत होत्या. तसेच खडी व मातीमुळे वाहन घसरण्याची शक्यताही निर्माण होत होती. रस्त्याची दुरुस्ती झाल्याने या समस्येतून नागरिकांची काही प्रमाणात सुटका झाली आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल नागरिक गणेश छल्लारे, सेवानिवृत्त सैनिक संजय सुपेकर, सूर्यकांत जगताप, पोलीस कर्मचारी बुधावले यांच्यासह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रस्त्याची नियमित पाहणी करून भविष्यात पुन्हा खड्डे पडू नयेत, तसेच आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.






