Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण एस.टी. बस स्थानकात प्रवाश्यांचे दागिने लांबवणाऱ्या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश; चोरट्या दोन महिलांना बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 13 August 2026, 17:22

भिगवण, (पुणे) : भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदनवाडी चौफुला बस स्टॉपवर एसटी बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्सची चेन उघडून तब्बल 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र चोरणाऱ्या ‘लेडीज गँग’चा भिगवण पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी दोन संशयित महिलांना घेराव घालून पकडले. पोलीस ठाण्यात झडती घेतली असता चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुमन आश्विन उपाधे (वय 26) व मोहीत राहुल कांबळे (वय 28, रा. दोघेही टेंभूर्णी, अकलूज चौकापुढे, ता. माढा, जि. सोलापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. याबाबत उज्वला गणेश गायकवाड (वय-45, रा. पिंपळी, ता. बारामती, व्यवसाय – वॉर्डन) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्वला गणेश गायकवाड या नातवंडांना भेटून खेड (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथून परत पिंपळीकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. प्रवासात दागिने चोरीला जाण्याच्या भीतीने त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याचे मणी-मंगळसूत्र काढून पर्समधील लहान पाकीटमध्ये कडक सुरक्षित ठेवले होते.

मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्या मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे भिगवण-बारामती एसटी बसमध्ये चढत असताना, बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिलांनी त्यांच्या पर्सची चेन उघडून सोन्याच्या दागिन्यांचे पाकीट लांबवले. बसमध्ये चढल्यावर पर्सची चेन उघडी दिसल्याने आणि सोन्याचे पाकीट गायब असल्याचे लक्षात येताच उज्वला गायकवाड यांनी तात्काळ एसटी बसमधून खाली उतरून शोध सुरू केला.

 

चौकातील एका मावशीने दिलेल्या माहितीवरून दोन महिला समोरच्या स्वीटहोमच्या दिशेने गेल्याचे समजले. त्याच वेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अंमलदार वंदना भोंग यांच्या मदतीने त्यांनी स्वीटहोमच्या दिशेने धाव घेतली. तेथे संशयास्पदरित्या थांबलेल्या दोन महिलांकडे विचारपूस केली असता त्या उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्या.

दरम्यान, महिला पोलीस अंमलदार वंदना भोंग यांनी पोलीस स्टाफ व दोन पंचांच्या समक्ष आरोपी महिलांची कडक झडती घेतली असता, त्यांच्याकडे 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे 1 तोळा वजनाचे सोन्याचे दोन डोर्ले व मणी असलेले मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी उज्वला गायकवाड यांच्या तक्रारीवरून भिगवण पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!उपचार सुरू, रात्री उशिरा मोठी घडामोड

Friday, 11 September 2026, 8:42

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13
Next Post

मांजरी येथील तुपे पार्कसमोरील रस्त्याच्या कामाने नागरिकांना दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp