भिगवण(पुणे): पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेचा 13 वा वर्धापनदिन दि. 16 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हनुमंत (नाना) बनसुडे यांनी आपल्या भाषणातून संस्थेची यशोगाथा सांगितली. तसेच आंतरशालेय सांघिक खेळामधील सहभागी विद्यार्थ्यांना त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले तसेच एलिमेंट्री व इंटरमिजिएट चा रिझल्ट शंभर टक्के लावल्याबद्दल कला शिक्षिका प्रतिभा भोसले, अंबिका बनसुडे यांचाही शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून त्यांचे अनुभव सांगितले, पहिली, दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता व माझी शाळा अशा गीतामधून शाळेविषयी एक चांगला संदेश दिला. तसेच सहावीच्या विद्यार्थ्यांनी मला बाजारला जायचे या नाटिकेतून प्लास्टिक मुक्त अभियानाबद्दल संदेश दिला आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्याध्यक्षा नंदाताई हनुमंत बनसुडे (नानी), सचिव श्री नितिन बनसुडे, सदस्य सौ अर्चना लक्ष्मण बनसुडे, हनुमंत (आप्पा) मोरे, सौ.अनुराधा कणके, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, समन्वयक सुवर्णा वाघमोडे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दरदरे यांनी केले तर शिक्षिका पोटे यांनी आभार मानले.