पुणे : लोणावळ्याजवळ पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर एका खासगी बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या २३ पैकी ११ प्रवाशी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त झालेली बस ही कोल्हापूरहून बोरिवलीच्या दिशेनं निघाली होती.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, आज गुरुवारी सकाळी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि कंटेनर ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात बसचा पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. ही बस कोल्हापूरहून बोरिवलीच्या दिशेनं निघाली असल्याची माहिती मिळत आहे. या बसमधून २३ प्रवासी प्रवास करत होते, यांपैकी ११ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.