Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षकांचा पगार 8 वर्षे थकवला, आता हायकोर्टाचा दणका! सिंहगड संस्थेची CBI, ED कडून चौकशी; हायकोर्टाची कठोर कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 12 November 2026, 12:02

मुंबई : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच निवृत्तीवेतनाचे लाभ तब्बल 8 वर्षांपासून थकवल्याप्रकरणी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अडचणी वाढल्या आहेत. या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. संस्थेच्या 44 शैक्षणिक संस्थांमधील निधीचा वापर, बँक खाती आणि विश्वस्तांच्या मालमत्तेची तपासणी आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून केली जाणार आहे.

न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI), सक्तवसुली संचालनालय (ED) आणि आयकर विभागाला या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संस्थेच्या ट्रस्टची बँक खाती आणि गुंतवणूक गोठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विश्वस्तांना त्यांच्या मालमत्तेचे व्यवहार करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यासाठी संस्थेने 60 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. अनेक कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे पगार मिळालेला नसल्याची बाब सुनावणीदरम्यान समोर आली. या आर्थिक त्रासामुळे 12 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेखही न्यायालयाने केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी व्यवस्थापकीय विश्वस्त मारुती नवले यांच्यासह इतर विश्वस्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

संस्थेच्या 44 शैक्षणिक संस्था सुरू असून विद्यार्थ्यांकडून शुल्कही घेतले जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मग कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी निधी उपलब्ध का झाला नाही, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

वेतनासाठी असलेला पैसा अन्य व्यवसायांकडे किंवा परदेशात वळवण्यात आला आहे का, याचीही तपासणी होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंगचा संशय तपासातून स्पष्ट होईल. दरम्यान, संस्थेच्या 13 शाळांची मान्यता रद्द करणे आणि तांत्रिक शिक्षण संस्थांवर प्रशासक नेमण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

फुरसुंगीत रिक्षा बाजूला घेण्याच्या वादातून टोळक्याची तिघांना बेल्ट, लाठी-काठीने बेदम मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp