Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बुलेट चोरायचा, सरकारी लोगो लावायचा अन् बिनधास्त फिरायचा! बारामतीत 23 वर्षीय तरुणाच्या कारनाम्याने पोलीसही चक्रावले; 30 लाखांच्या 19 दुचाकी जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 14 August 2026, 13:20

आदित्य बोराटे 

बारामती: बारामती शहर तसेच बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करून एका युवकास अटक केली. त्याच्याकडून सुमारे ३० लाख रुपये किमतीच्या १३ बुलेट मोटारसायकली व ६ इतर मोटारसायकली, अशा एकूण १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कारवाईत १९ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.

समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बारामती शहर परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांची पथके गस्त घालत असताना चोरीची मोटारसायकल घेऊन मेडिकल कॉलेज परिसरात एक संशयित येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याच्याकडे व्हीआयपी क्रमांकाची प्लेट असलेल्या बुलेटसह इतर मोटारसायकली आढळून आल्या. चोरी केलेल्या वाहनांवर महाराष्ट्र पोलिस, महाराष्ट्र वनसेवा व एसटी महामंडळाचे लोगो लावून त्यांचा वापर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

पोलिसांनी आरोपीकडून १३ बुलेट मोटारसायकली व ६ इतर मोटारसायकली जप्त केल्या. या वाहनांची किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे बारामती शहर व बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेले १९ गुन्हे उघडकीस आल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी पो.स.ई. बाळासाहेब कारंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलानी, गणेश डेरे, बारामती तालुका पोलीस ठाणे पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे, विठ्ठल तरंगे, यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन करत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55
Next Post

‘पुणे प्राईम न्यूज’च्या बातमीचा दणका! मृत्यूचा सापळा ठरलेले शिरुर बायपासचे अनधिकृत दुभाजक अखेर बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp