डॉ. अशोक बालगुडे

पुणे: “व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्यासह कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीवरही विपरीत परिणाम होतो. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा,” असे आवाहन प्राचार्य प्रफुल्ल आडकर यांनी केले.

हडपसर-हांडेवाडी रोड येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये ‘नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ घेण्यात आले. गुरुवारी जयवंत सभागृहात झालेल्या उपक्रमात BK स्मिता दिदीजी व BK सुनीता दिदीजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यसनांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक व कौटुंबिक जीवनावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करून युवकांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थी व उपस्थितांनी व्यसनमुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

कार्यक्रमाचे नियोजन प्रा. प्रगती लगदिवे यांनी केले. प्रा. अनुराधा पाटील, डॉ. रविराज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. चेतन मामडगे, डॉ. अजय साळुंखे यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.







