विजयकुमार गायकवाड
इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी व्याहाळी (ता. इंदापूर) येथील सोमनाथ पांडुरंग भोंग यांची निवड करण्यात आली.
पुण्यात राष्ट्रवादीची (शरद पवार गट) बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोमनाथ भोंग यांना नुकतेच निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष पैगंबर शेख, इंदापूर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष तेजस पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विचार व खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे, पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सोमनाथ भोंग यांनी सांगितले.