बापू मुळीक
पुरंदर : सोनोरी (ता. पुरंदर) येथील अलका शेळके यांनी आपला उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज श्रद्धा काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच संतोष काळे यांनी उपसरपंच पदी श्रद्धा राहुल काळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सरपंच संतोष काळे, नूतन उपसरपंच श्रद्धा काळे, अलका शेळके, भारत मोरे, नितीन काळे,रामदास काळे, सुरेखा माळवदकर, मंदाकिनी काळे, मंगल अढागळे, निवृत्ती गावडे,अण्णा काळे, उमेश गायकवाड, मंदार गिरमे, राजू झेंडे,सुरेश काळे, दत्ता काळे, विलास काळे, श्रीधर शिंदे, बाबा काळे, सीमा झेंडे, सुभाष काळे पोलीस, रमेश काळे, निखिल दिवेकर, महिला मंडळ यांची लक्षणीय उपस्थिती, जेष्ठ नागरिक, युवक, युवती, शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर बोलताना काळे म्हणाल्या की, गावातील नाथाचे त्रिशूल घेण्याचा मान हा कै. तात्या भिवा काळे माझ्या कुटुंबातील सदस्याचा होता, तोच आधार तिसऱ्या पिढीत मला महिला म्हणून उपसरपंच पदी निवड झाल्यामुळे मिळाला. गावातील पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, महिलांच्या मूलभूत गरजांचा, प्राधान्याने असणाऱ्या अडचणी यावर माझ्या कार्यकालात भरपूर वेळ देऊन सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. तसेच गावातील मंदिरात महिलांना आत जाण्याची परवानगी नव्हती. ती गावच्या एकमुखी धोरणामुळे आम्हा गावातील महिलांना मंदिरात प्रवेश मिळाला असल्याचे सुद्धा नूतन उपसरपंच श्रद्धा काळे यांनी सांगितले. प्रास्ताविक सरपंच संतोष काळे यांनी केले. सूत्रसंचालन जालिंदर काळे यांनी केले. तर आभार राहुल काळे यांनी मानले.