लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील विश्वराज हॉस्पिटलच्या बाहेर अंदाजे 35 वर्ष वय असणाऱ्या अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा तरुण हा मंगळवारी (ता. 08) विश्वराज हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या मेडिकलच्या बाहेर संध्याकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याला तात्काळ लोणी काळभोर पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या नातेवाईकांचा लोणी काळभोर पोलिसांनी शोध घेतला असता अद्याप मिळून आलेले नाहीत.
दरम्यान, मृत तरुणाच्या अंगात फिक्कट राखाडी रंगाचा फुल भाह्याचा शर्ट त्यावर काळे रंगाचा बरमुडा आहे. डोक्याचे केस काळे व वाढलेले, दाढी बारीक वाढलेली आहे. या वर्णनाच्या तरुणाविषयी कोणाला काही माहिती असल्यास पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट- 8879706088, पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी-9022464375 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लोणी काळभोर पोलिसांनी केले आहे.