यवत : खामगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील गाडीमोडी चौकाजवळ घरगुती कारणावरून एकाने ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. 03) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास खामगाव गावचे हद्दीतील घडामोडी चौकात हि घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला पोलिसांना अटक केली आहे.
सुरज राहुल भुजबळ (वय- 23, रा. गाडीमोडी, चौक, खामगाव, ता. दौंड) से खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अमित जयवंत बहिरट वय – 24 ) व समिर जयवंत बहिरट (वय – 22 रा. दोघेही रा. खामगाव, ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यातील अमित बहिरट हा मुख्य आरोपी आहे. त्याला यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज राहुल भुजबळ याचे खामगाव ग्रामपंचायत हद्दीतील गाडीमोडी चौकात एक कपड्याचे दुकान आहे. अमित जयवंत बहिरट व संजना राहुल भुजबळ याच्यात प्रेम संबंध होते. व त्यांनी पळवून जाऊन आंतरजातीय विवाह रजिस्टर लग्न केले होते. काही कारणावरून वारंवार भांडणे होऊन त्यांचा विवाह संपुष्ठात आला होता. या कारणावरून सुरज याने बहिणीला घरी आणले होते.
याप्रकरणी मुलीची आई सुवर्णा भुजबळ व (भाऊ) सुरज भुजबळ यांनी मुलगी- बहिणीला धीर देऊन आधार दिला. अमित बहिरट याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात वारंवार भांडणे होत असल्याने फिर्याद दिली होती. यवत पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार केल्याच्या कारणावरून पत्नी संजना भुजबळ हिला सोडचिट्टी देण्याच्या मोबदल्यात आरोपी बहिरट हा 5 लाख रुपये मागत होता. त्यानुळे हे पैसे न दिल्याचा राग बहिरट याच्या मनात होता. त्यामुळे भुजबळ कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सुरज हा चौकातील दुकानात बसलेला असताना आरोपी अमित बहिरट आला व त्याने धारदार कोयत्याने मानेवर वार करून सुरज भुजबळ याचा खून केला. हत्येचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन ते तीन महिन्यांपूर्वी मयत सुरज भुजबळ याचे लग्न झाले असल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळी तणाव..
आरोपीला अटक करीत नाही तोपर्यंत सुरजचा मृतदेह घटना स्थळावरून हलवण्यात नातेवाईकांनी नकार दिला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मयत सुरज भुजबळ यांच्या मृतदेहाला हात लावायचा नाही अशी आरोळी टाकत यवत पोलिसांना सुरजच्या आईने बजावले. आईच्या हंबरड हृदय पिळवटून गेला. या घटनेने परिसरात संन्नाटा पसरला होता.
यवत पोलिसांचा निषेध..
मयत सुरज राहुल भुजबळ याच्या मृत देहाजवळ आक्रोश करीत बसलेल्या (आईने) सुवर्णा भुजबळ यांनी जमिनीवर सांडलेल्या रक्ताच्या थारोळ्यातील वंजळभर रक्त हातात घेऊन यवत पोलीसांच्या अंगावर फेकत मुलांच्या खुनाचा आक्रोश केला. आईच्या काळजाने हंबरडा फोडुन यवत पोलिसांविरुद्ध निषेध व्यक्त केला. पोलिसांना वारंवार सांगूनही पोलिसानी लक्ष दिले नाही. जर पोलिसांनी अगोदरच आरोपीवर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती.