Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: न्हावरे–शिरूर ग्रामीण गटात तिरंगी लढतीचे संकेत; भावनिक मुद्द्यांवर मालती पाचर्णेंचे पारडे जड…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 25 January 2026, 18:57
Shirur News: Signs of a three-way fight in the Nhaware-Shirur rural group; Malti Pacharne's arguments are strong on emotional issues.....

न्हावरे: न्हावरे–शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटाची (Shirur News) निवडणूक भावनिक आणि विकासाच्या मुद्द्यांवर रंगणार असून,या गटामध्ये माजी आमदार स्व.बाबुरावजी पाचर्णे यांच्या (Nhavare News) पत्नी मालती पाचर्णे यांचे पारडे सध्या जड मानले जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या तरी पाचर्णेंची बाजू वरचढ असल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आल्यानंतर या गटामध्ये राष्ट्रवादीकडून वृषाली वाळके यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून गटामध्ये दांडगा जनसंपर्क असलेल्या तृप्ती सरोदे यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने सरोदे नाराज झाल्या. त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे न्हावरे–शिरूर ग्रामीण गटात तिरंगी लढत होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसून येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वृषाली वाळके या नवख्या उमेदवार असून, त्यांच्यासमोर भाजपच्या अनुभवी आणि परिचित चेहरा असलेल्या मालती पाचर्णे यांचे आव्हान पेलणे सध्या तरी अवघड मानले जात आहे. मात्र, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांकडून होणाऱ्या जोरदार हालचाली, मतदारांशी थेट संपर्क आणि तथाकथित ‘लक्ष्मी दर्शन’ यामुळे वातावरण बदलून निकाल फिरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

असे असले तरी पाचर्णे कुटुंबाविषयी मतदारांमध्ये असलेले प्रेम, तसेच माजी आमदार स्व. बाबुरावजी पाचर्णे यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूती, याचा थेट फायदा मालती पाचर्णे यांना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विविध राजकीय समीकरणे,तिरंगी लढत आणि बदलत्या घडामोडी यामुळे न्हावरे–शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटाची निवडणूक मालती पाचर्णे यांच्या बाजूने झुकलेली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 

त्याचप्रमाणे न्हावरे पंचायत समिती गणातून भाजपाचे सागर खंडागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक कोकडे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार आहे.तर शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणामध्ये भाजपच्या उज्वला भोस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती घावटे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांची डोकेदुखी वाढली! बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण पुन्हा एकदा भूसंपादनाच्या कचाट्यात

Tuesday, 22 September 2026, 23:03

विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

Tuesday, 22 September 2026, 22:27

पाऊस आला, पालिका झोपली; वाहतूक पोलिसांनीच चेंबर उघडून रस्ता केला मोकळा

Tuesday, 22 September 2026, 22:07

पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांचं ‘क्राईम सीन रिक्रिएशन’; पुन्हा त्या जागेची झडती घेतली अन्…

Tuesday, 22 September 2026, 21:18

गाडी घासल्याच्या कारणावरून हायवेवर राडा! तिघांना काठीने बेदम मार मारहाण; वाघोली येथील पाच जणांना अटक

Tuesday, 22 September 2026, 20:31

८,५०० रुपयांची लाच महागात पडली! सोलापूर जि.प.च्या वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Tuesday, 22 September 2026, 20:27
Next Post
Satara Drug Case: Drug 'factory' in remote area of ​​Karad? Pune's DRI team conducts daring midnight raid; What is really going on in Satara?

Satara Drug Case: कराडच्या दुर्गम भागात ड्रग्जची 'फॅक्टरी'? पुण्याच्या DRI पथकाचा मध्यरात्री धाडसी छापा; साताऱ्यात नेमकं चाललंय काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp