Shirur News : नवरात्र म्हणजे स्त्रियांच्या तेज, कला, इच्छाशक्ती अनेक रूपांचा जागर करणे होय. तिला तिच्या कार्याची, कर्तव्याची, हक्काची व आर्थिक कौशल्याची जाणीव करून देणे होय. महिलांना संघटीत करून त्यांचे प्रश्न सोडवणारी तसेच पुरूषांच्या खांद्याला खांदा देऊन विकासाच्या गती देणारी…गावच्या प्रगतीसाठी झटत राहणारी…त्या बरोबर जनतेच्या कल्याणासाठी सतत लढणारी टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील सरपंच अरूणा घोडे या आजच्या काळातील नवदुर्गा आहेत.
त्यांच्या कार्याला अधिक बहुमान..
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी हे गाव नंदनवन झाल्याचे पहावयास मिळते. घोडनदीवरील पाणी व्यवस्थापनामुळे या भागात 80 टक्के बागायत क्षेत्र वाढले आहे. त्यातून प्रगतीचे मार्ग खुले झाल्याचे पहावयास मिळते. पती दामुआण्णा घोडे यांनी या गावचे सरपंच पद भुषविले. त्यातून वेगवेगळ्या विकासाची कामे करण्यात आली. पतीच्या सामाजीक कार्याच्या आवडीने अरूणा घोडे यांना सरपंच पद सहजतेने मिळाले. पाच वर्षात सरपंच पदाची धुरा संभाळताना वेगवेगळ्या केलेल्या कामातून गावाला वैभव मिळाले. पहिल्या पंचवार्षीक मध्ये मिळालेली सरपंच पदाची संधी त्यानंतर त्यांची पंचायत समिती सदस्य म्हणून निवड झाली. त्यात देखील त्यांनी पाच वर्ष काम केले. या दरम्यान त्यांनी टाकळी हाजी पंचायत समिती गटात देखील विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे परिसरातून त्यांच्या कार्याला अधिक बहुमान मिळू लागला.
योग्य संघटन व कार्यतत्परता यातून गरीब जनतेची वेगवेगळी कामे मार्गी लागू लागली. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू लागले. भिल्ल समाजातील नागरिकांना जातीचे दाखले, घरकूल यामुळे सर्वसामान्यांच्या मनात त्यांचे कार्य घर करू लागले. या काळात राजकारणात घडलेल्या घडामोडी मुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. परंतू त्याचा परिणाम न होता. पुन्हा पुढील पंचवार्षीक ला देखील सरपंच पदाची माळ अरूणा घोडे यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे अधिक जोमाने सध्या त्या टाकळी हाजी गावचे सरपंच पद भुषवित आहे.
गाव हा एक प्रपंच या भावनेने ते काम करताना दिसतात. त्या पाठोपाठ कुटूंबातील एकोपा टिकवत प्रपंचासाठी त्यांचे काम तेवढेच महत्वाचे आहे. संकरीत जनावरांसाठी मुक्त गोठा तयार करून त्यांनी गोठ्यातून दुधाची गंगा आणली आहे. जवळपास 100 गायांचे संगोपन करून आर्थीक पाया उभा केला आहे. कुक्कुटपालन करून मोठ्या प्रमाणात गावठी कोंबड्या व त्यापासून अंडी मिळविण्याचे काम त्या सहजतेने करतात. ऊस शेती पाठोपाठ डाळिंब, खरबूजाचे पिक घेऊन कुटूंबाची आर्थीक बाजू त्यांनी संभाळली आहे. शेती व्यवसाय व शेती पुरक व्यवसाय करून कुटूंबाला पाठबळ देण्याचे काम सहजतेने करतात.
जनतेच्या कल्याणासाठी नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटी गाठी घेताना आढळतात. कुटूंबाच्या कामातून वेळ काढून सामाजीक कार्यात अग्रेसर राहतात. शुभल ला बिएएमएस करून डॅाक्टर केले तर शेखर बि फार्मसी पर्यत चे शिक्षण दिले आहे.
महिलांनी भविष्यातील आर्थीक संकटांचा अंदाज घेतला पाहिजे. उद्योगातील मंदी व आरोग्यावरील संभाव्य खर्च यासाठी पैशाचे नियोजन करावे. आज जगात गुंतवणीच्या अनेक संधी व प्रकार उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करावा. आपल्या परिश्रमाचा पैसा सुरक्षित ठिकाणी आणी आपल्याला हवा तेव्हा मिळण्यासाठी आर्थीक नियोजन आणी त्याच्या अभ्यासाचे तंत्र शिकणे गरजेचे आहे. या नवरात्रीत आर्थीक नियोजनाचे व गुंतवणूकीचे नवकौशल्य आत्मसात करण्याचा संकल्प महिलांनी करावा.
अरूणा घोडे (सरपंच- टाकळी हाजी, ता. शिरूर )