समाजात अनेक पिडीत मागास असलेला समाज आजही रूढी पंरपरेच्या जाचात अडकलेला पहावयास मिळतो. दुखाः बरोबर गरीबी हलाखीची परिस्थीतीत आजचा दिवस ढकलण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सायंकाळची भाकरी मिळाली की दुसऱ्या दिवशी भाकरी शोधण्यात त्यांचा दिवस सुरू होतो. त्यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण आणी आरोग्याकडे पहाण्यासाठी त्यांना वेळ देखील मिळत नाही. अशा अदिवासी, ठाकर समाजातील महिला, जेष्ठ आणि चिमुकल्यांसाठी सेवा सुवीधा द्यायची. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आनंदी जीवन जगण्याच बळ देण्याचे काम शिरूर येथील वैशाली चव्हाण या तेजस्विनी फाऊंडेशन च्या माध्यमातून करत आहेत.
आनंदी जीवन जगण्याच बळ देण्याचे काम फाऊंडेशन च्या माध्यमातून
शिरूर तालुक्यात वंचीत असणारा समाज मोट्या प्रमाणात असल्याने त्यांच्या उन्नतीसाठी काहितरी काम करता येईल. याबरोबर समाजासाठी वेगळे काही करण्याचा त्यांचा मानस होता. परिसरात जवळपास ३२ बचत गट तयार करून त्यांनी महिला व पुरुषांना एकत्रीत आणण्याचे काम केले. यामध्ये महिला, वंचीत घटक, दारिद्र रेषेतील महिलांचा गट असे स्थापन केले. या माध्यमातून कायदा, आरोग्य यांचे प्रशिक्षण दिले. शिबीरे घेऊन महिलांना आत्मसन्मानीत करण्याचे काम केले.
महिलांसाठी उभे केलेले काम आणि एमएसडब्लु चे घेतेलेल शिक्षण या अनुभवाच्या जोरावर त्यांनी २०१८ मध्ये तेजस्विनि फाउंडेशन ही संस्था उभी केली. त्या माध्यमातून त्यांनी आदिवासी, पारधी, ठाकर या समाजातील महिला, मुले, जेष्ट मंडळीना मदत करण्याचे काम केले. वंचीत घटकातील समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी काम करण्याचे उद्दिष्ट ठेवूनच या १५ महिला एकत्रीत आल्या.
शिरूर तालुक्यात कोणतीही दुर्घटना झाल्यावर तेजस्विनी फाऊडेशनच्या महिला मदत करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. आमदाबाद, न्हावरा, जांबूत येथील जळीताच्या घटनेत संपुर्ण संसार रूपी वस्तू देऊन या कुटूंबाना आधार देण्याचे काम या महिलांनी केले आहे. त्यामुळे तेजस्विनी फाऊंडेशन ही संस्था अल्पावधीत नावारूपाला आली. पारधी समाजातील मुलीच्या होटावर शस्त्रक्रिया करण्यात ही संस्था यशस्वी झाली. त्यामुळे या समाजाला सुद्धा मदत करणारी संस्था जवळची वाटू लागली. कवठे येमाई येथील ठाकर समाजातील महिलांनी संसाररूपी वस्तू, कपडे देऊन त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केला. शिरूर येथील पारधी समाजातील मुलांना आरोग्यविषयक साक्षर करण्याचे काम त्यांनी केले.
या वंचीत समाजात पिडीत महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातून कायद्याचे अज्ञान असल्याने त्यांची अनेकवेळा मानहानी केली जाते. पण त्यांना कायद्याची माहिती देऊन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. या महिलांचे समुउपदेशन होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी समउपदेशन कार्यालय सुरू केले. येथे पिडीत महिलांना समउपदेशन करण्याचे काम त्या करतात. या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी ही सर्व जबाबदारी स्विकारली आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक महिलांचे व पुरूषांचे समुपदेशन करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे घटस्फोट घेण्याकरिता आलेले पतीपत्नी यांचे मनोमिलन झाल्याने कुटूंबाची घटी पुन्हा बसल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
सध्या वंचीत घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या समाजातील नवीन पिढीला योग्य दिशा मिळण्याचे काम होणार आहे. वंचीत घटकातील मुलांच्या प्रगतीसाठी त्यांनी जीवन खर्च करण्याचे काम केले आहे. जीवनात अनेक सुखदुख आहेत. पण वंचीत घटकातील समाजाच्या महिला, मुले व जेष्टाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की त्यांच्यासाठी केलेल्या कामाच समाधान मिळते. त्यातून एक नवी पिढी सुसंस्कारीत होऊन त्यांना जगण्याची नवी दिशा मिळेल हा आनंद सगळ्यात मोठा आहे.
वैशाली चव्हाण (अध्यक्ष – तेजस्विनी फाऊंडेशन)