Sharad Pawar News : ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना बळीराजाबाबत आस्था नाही. कांद्यासह शेतमालाला बाजार नाही. कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांवर संकट ओढविण्याचे काम सुरु आहे. बळीराजा संकटात जाईल असे काम केले जात आहे. मात्र एकजुटीने महाराष्ट्राचे चित्र बदलणार..” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “साहेब केसरी” बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. (Sharad Pawar)
तसेच पुढे बोलताना म्हणले, “काहीजण म्हणतात तुम्ही ८३ वर्षांचा झाला. पण मी अजुन तरुण आहे. लवकरच नवा इतिहास घडवू…” असं म्हणत शरद पवार यांनी विरोधकांना कानपिचक्या देत जोरदार हल्लाबोल चढवला.
दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पुणे जिल्ह्यात शरद पवारांचा गट मोठ्या ताकदीने सक्रिय होताना दिसत आहे. खेड तालुक्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “साहेब केसरी” बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हणले, आजपर्यंत टिव्हीवर बैलगाडा शर्यती पाहिल्या, पण घाटात आल्याशिवाय डोळ्याचं पारणं फिटत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी बैलगाडा शर्यतीचे कौतुक केले. बैलगाडा शर्यत ही वेगवान स्पर्धा असून शर्यतीबाबत धोरणात्मक निर्णय घेतले तर जागतिक पातळी नावलौकिक होईल, असेही शरद पवार म्हणाले.