उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता.हवेली) येथील शामल संतोष पंडित यांनी एलआयसी मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एलआयसीच्या वतीने ”एमडीआरटी २०२२” पुरस्काराने देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे.
शामल पंडित ह्या उरळीकांचन येथील एलआयसीच्या अधिकृत विमा प्रतिनिधी आहेत. पंडित यांनी विकास अधिकारी दिनेश कासवेद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिक, सातत्य पुर्ण काम केले आहे. तसेच नागरिकांना एलआयसीच्या नवनवीन योजना देऊन त्या घरोघरी पोहचविण्यासाठी प्रयत्न केला. पंडित यांच्या सातत्यपुर्ण कामामुळे त्यांना आयुर्विमा शेत्रातील सर्वोच्च जागतिक पुरस्कार MDRT2022 मिळवला आहे.
शामल संतोष पंडित यांना विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पहिल्याच वर्षी जागतिक विमा परिषदेकडून एमडीआरटी पुरस्कार मिळालेला आहे. अमेरिकेमध्ये होणाऱ्या जागतिक विमा परिषदेला उपस्थित राहण्याची त्यांना संधी मिळाली आहे. शामल पंडित यांनी एलआयसीच्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन केलेल्या पॉलिसीच्या संख्येवर ते केवडिया गुजरात, गोवा या ठिकाणी होणाऱ्या एलआयसीच्या मीटिंगसाठी पात्र झाले आहेत. तसेच एका दिवसात पंचवीस पॉलिसी करून ते डिव्हिजन व ब्रांच मध्ये पैठणी साडी साठी पात्र झालेल्या पहिल्या महिला एजंट आहेत.
दरम्यान, विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळ ९५२ शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक मुकुंद भाईक ,शाखा व्यवस्थापक अभिमन्यू सिंग , विशेष मार्गदर्शक विकास अधिकारी दिनेश कासवेद यांनी .शामल पंडित व त्यांचे पती संतोष पंडित यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .