Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर तालुक्यात खळबळ! अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 30 October 2026, 10:25

आदित्य बोराटे

इंदापूर: अनैतिक संबंधांच्या संशयातून २९ वर्षीय तरुणाची लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घडली. गुरुवारी (दि. २९) ३.४५ वाजण्याच्या सुमारास केतकेश्वर विद्यालयाजवळ पालखी महामार्गावर ही घटना घडली. पुष्पराज मुरलीधर गायकवाड (वय २९, रा. सणसर, ता. इंदापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मृत पुष्पराज यांची आई सुलोचना मुरलीधर गायकवाड (वय ४७, रा. सणसर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील भीमराव बारवकर आणि अशुतोष संजय भोंग (दोघेही रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पुष्पराज याचे निमगाव केतकी येथील तलाठी भाऊसाहेब बारवकर यांच्या पत्नी तेजस्विनी बारवकर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपींनी त्याला लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने पुष्पराज याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे सणसर आणि निमगाव केतकी परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे पुढील तपास करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पी.एस.आय स्वाती सुरवसे यांनी केली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

12 किलो गांजासह अटक झालेला पोलिस अंमलदार शासकीय सेवेतून बडतर्फ; तेलंगणातील वारंगलमध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी कारवाई

Saturday, 31 October 2026, 13:32

उरुळी कांचन पोलिसांच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट! मटका, जुगार, गांजा अन् देहविक्रीच्या खुलेआम धंद्याचा व्हिडिओ पहा; ‘वसुली’च्या चर्चेने पोलीस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात!

Saturday, 31 October 2026, 13:16

शिरूर नगरपरिषदेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत! मितेश गादिया यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर; ‘नितीन पाचर्णे’ होणार उपनगराध्यक्ष?

Saturday, 31 October 2026, 12:33

उजनी धरणातून सोलापूरच्या विकासाला मिळणार नवी गती! मोठ्या प्रकल्पाची तयारी; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची महत्त्वपूर्ण माहिती

Saturday, 31 October 2026, 12:21

पुणे-सोलापूर महामार्गावर लक्झरी बसची दुचाकीला धडक ; सहजपूर येथील 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, चालक बस सोडून पसार

Saturday, 31 October 2026, 12:01

आजारपणाच कारण देत सुट्टी घ्यायचा अन् करायचा गुन्हेगारी कारनामे ! अखेर पुणे पोलिसातील कर्मचाऱ्याचं भिंग फुटलं..

Saturday, 31 October 2026, 11:26
Next Post

मांजरीत भरदिवसा घरफोडी; रोकडसह सुमारे 2 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp