इंदापूर: रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे तसेच हेल्मेट व सीट बेल्ट याचा वापर वाहनधारकांनी करावा याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याकरिता विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये स्टुडन्ट मेंटेरिंग सिस्टीम अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले होते.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती व विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक तेजस मखरे व रोहित भोसले तसेच इंदापूर येथील पोलीस कॉन्स्टेबल सुहास करणे, अमोल खाडे, अनिल नागरगोजे हे अधिकारी उपस्थित होते.
या जनजागृतीपर कार्यक्रमामधून, सिग्नलचे पालन करणे, गाडी चालवताना मोबाईल बोलू नका. कानाला हेडफोन लावू नका, गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन स्टुडन्ट मेंटेरिंग सिस्टीमचे प्रीसायडिंग ऑफिसर प्रा. राजीव वाघमारे यांनी केले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता बारामती येथील उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, इंदापूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.