राजु देवडे
लोणी धामणी : देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी १ जानेवारी पुकारलेल्या बंदमध्ये पुणे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारही सहभागी होणार असल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ वचकल यांनी दिली आहे. १ जानेवारीपासून फेडरेशनने बेमुदत बंद पुकारला आहे. दरम्यान, १६ जानेवारीला दिल्ली येथील रामलिला मैदानावर आंदोलन केले जाणार आहे.
फेडरेशनचे महासचिव विश्वंभर बासू व महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी केलेल्या आवाहनानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रेशनिंग दुकानदार या बंद मध्ये सहभागी होणार आहेत, असे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ वचकल यांनी सांगितले आहे.
‘या’ आहेत मागण्या
- रेशन दुकानदारांना निश्चित उत्पन्नाची हमी
- कमीशन वाढ
- धान्य बरोबर डाळ तेल
- डी.बी.टी सुरू करु नका
- अनेक वर्षापासून बंद असलेली केरोसीन दुकान पूर्ववत करा
- अन्न धान्य चांगले दर्जाचे ज्युट बॅग मधून देण्यात यावे
- कालबाह्य झालेली पोस मशीन बदलून अत्याधुनिक मिळावी