(Railway) पुणे : पुणे-गोरखपूर-पुणे दरम्यान उद्या शुक्रवारपासून (२१ एप्रिल) १७ जूनपर्यंत १८ अतिरिक्त उन्हाळी साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन या गाड्या चालविण्यात येणार आहेत.
२१ एप्रिलपासून दर शुक्रवारी सायंकाळी चार वाजून १५ मिनिटांनी सुटेल
पुणे-गोरखपूर विशेष गाडी २१ एप्रिलपासून दर शुक्रवारी सायंकाळी चार वाजून १५ मिनिटांनी सुटेल. ती गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता पोहोचेल. गोरखपूरहून दर शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी गाडी पुण्यासाठी सुटेल. ती तिसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी पुण्यात दाखल होईल.
या गाडीला दौंड, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगणा राणी लक्ष्मीबाई जंक्शन, उरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलिलाबाद असे थांबे असणार आहेत.