राहुलकुमार अवचट

यवत: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग प्रशासनाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून जवळपास 80 दिवे लावण्यात आले असून गेल्या चार दिवसांपासून हे दिवे बंद होते. परंतु गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले हायमास्ट दिवे अखेर आज चालू झालेआहेत. याबाबत पुणे प्राईमच्या वतीने काल बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. यवत गावच्या हद्दीत सुमारे एक किमी अंतरावर दोन्ही बाजूला सुमारे ८० लाईटचे खांब उभे केले असून यावर सुमारे १६० हायमास्ट दिवे बसवण्यात आले. परंतु गेल्या चार दिवसांपासून हे दिवे बंद आहेत, महामार्गावरील सर्वच हायमास्ट दिवे बंद असल्याने यवत गावच्या हद्दीत महामार्गावर सर्वत्र अंधार पसरला होता. आज अखेर महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेल्या दिव्यांपैकी बहुतांश दिवे सुरू झाले पुन्हा एकदा यवत परिसर उजळून निघाला.









