Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसांचा ‘तगडा प्लॅन’; 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तर 2 हजार सीसीटीव्हींची नजर – आयुक्त अमितेशकुमार

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 24 September 2026, 11:18

पुणे, ता. 24 : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. शुक्रवारी (ता. 25) होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, मिरवणुकीच्या मार्गावर 2 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. विशेष म्हणजे, एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता आणि कुमठेकर रस्ता यांसह प्रमुख मार्गांवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षातून मिरवणुकीच्या संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

बेलबाग चौक, अलका चित्रपटगृहाजवळील लोकमान्य टिळक चौक, खंडोजीबाबा चौक, देशभक्त केशवराव जेधे चौक आणि स. प. महाविद्यालय चौक येथे पोलिस मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. चोरी, छेडछाड तसेच अन्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी साध्या वेशातील पोलिस, होमगार्ड आणि एसआरपीएफची पथकेही तैनात राहणार आहेत.

ध्वनिमर्यादा ओलांडली तर थेट गुन्हा

 

विसर्जन मिरवणुकीदरम्यान उच्च क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांचा वापर करून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार असून, मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

आपत्कालीन वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे बंब आणि पोलिसांची वाहने आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचू शकतील, यासाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

लेझर लाइटला मनाई

मिरवणुकीत लेझर लाइटचा वापर करू नये, असे आवाहन सहपोलिस आयुक्त संजय दराडे यांनी केले आहे. लेझरमुळे नागरिक तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित नियमांचे आणि न्यायालयीन आदेशांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची पथके तैनात करण्यात आली असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

“विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिक, गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी पोलिसांना सहकार्य करून सर्व नियमांचे पालन करावे.”
अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावला! शिरुरमध्ये बाजरी, मका, ऊस पिके भुईसपाट

Thursday, 24 September 2026, 11:22

गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसांचा ‘तगडा प्लॅन’; 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तर 2 हजार सीसीटीव्हींची नजर – आयुक्त अमितेशकुमार

Thursday, 24 September 2026, 11:18

दूध भेसळ प्रकरणात तुकाराम मुंडेंचा दणका! 17 लाखांच्या संशयास्पद व्यवहारात दोन बड्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Thursday, 24 September 2026, 11:10

शिरसवडीत दरवाजा उघडा दिसला अन् चोर घरात शिरला! महिलांचे सोन्याचे दागिने चोरले, आरडाओरड करताच झाला पसार

Thursday, 24 September 2026, 10:47

महिलांवरील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात संजय गायकवाडांना मोठा दिलासा; नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा आदेश

Thursday, 24 September 2026, 10:29

सतीश सालियन यांनी केलेले मानहानीचे आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळले; 500 कोटींच्या नोटिशीला दिले उत्तर

Thursday, 24 September 2026, 10:15
Next Post

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावला! शिरुरमध्ये बाजरी, मका, ऊस पिके भुईसपाट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp