Pune News : वाघोली : पुण्यात तीन दहशतवादी मिळून आल्यामुळे पुणे शहर पोलीस अॅक्शन मोडवर आहे. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जमा करावी. असे आवाहन लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी केले आहे. तसेच भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जमा न केल्यास संबंधित जागा मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशाराही दिला आहे. (Pune News)
भाडेकरूचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन;
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील घर,फ्लॅट,जागा,गोडाऊन,तसेच छोट्या मोठ्या कंपनी मालक, कॉन्ट्रॅक्टर व इतर मिळकतदाराने भाडेकरू ठेवताना भाडेकरूच्या चारित्र्य प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून घ्यावेत. त्याची माहिती पोलिसांना वेळेत सादर करावी. सुरक्षेच्या दृष्टीने हे गरजेचे आहे. (Pune News)
गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व सचिव यांनी भाडेकरूचे पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरूला गृहनिर्माण संस्थेत प्रवेश देऊ नये. तसा प्रवेश दिल्यास प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भाडेकरूचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन केल्यास घरमालकाने त्याची एक प्रत पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे.
(Pune News) दरम्यान, दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर भाडेकरूची माहिती ठेवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात प्रशासकीय पातळीवरून देखील माहिती सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. लोणीकंद पोलीसांनी एक पत्रक प्रकाशित करून भाडेकरारासह भाडेकरूची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन केले आहे. (Pune News)
याबाबत बोलताना लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
विश्वजीत काईंगडे म्हणाले कि, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील फ्लॅट धारक, बिल्डिंग मालक, जागा मालक, गोडाऊन मालक, तसेच छोटे-मोठे कंपनी मालक,कामगार कॉन्ट्रॅक्टर व मिळकतदारांनी भाडेकरूची व कामगारांची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित मालकांवर कायदेशीर व कडक कारवाई करण्यात येईल.