Pune News : पुणे : पुणे ते हरंगुळ (लातूर) रेल्वेसेवा मंगळवार १० ऑक्टोबरपासून दैनंदिन सुरू होत आहे. मात्र, लातूर रेल्वेस्टेशनऐवजी ही गाडी हरंगुळ स्थानकातून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. दररोज दुपारी ३ वाजता हरंगुळ येथून निघणारी ही रेल्वे पुण्यात ९ वाजता पोहोचणार आहे.
८ ऑक्टोबरपासून बुकींग सुविधा
पुण्याहून लातूरपर्यंतच्या प्रवाशांची नव्या रेल्वेमुळे सोय होणार आहे. पुणे येथून दररोज सकाळी ६.१० वाजता हरंगुळसाठी रेल्वे निघणार आहे. दुपारी १२.५० वाजता ही गाडी हरंगुळला येईल. येथील स्थानकात जवळपास दोन तास थांबल्यावर पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहे. पुण्यासाठी दुपारी ३ वाजता येथून ही रेल्वे निघणार आहे. पुणे स्टेशन येथे रात्री ९ वाजता पोहचणार आहे.
मुंबईहून येणाऱ्या लातूर रेल्वेत अनेकदा पुण्याच्या प्रवाशांना जागा मिळत नव्हती. त्यामुळे स्थानकातून मध्यरात्रीच्या वेळी प्रवाशांना परत जावे लागत होते. आता मुंबईहून येणाऱ्या रेल्वेत जागा नाही मिळाली सकाळी पुण्याहून लातूरपर्यंतच्या प्रवाशांची नव्या रेल्वेमुळे सोय होणार आहे.
दरम्यान, लातूर (हरंगुळ) – पुणे ही रेल्वे १५ डब्याची आहे. त्यामुळे जवळपास एक हजार ते बाराशे प्रवासी सहजपणे प्रवास करू शकतील. हडपसर, उरूळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी, धाराशिव आदी स्थानकावर थांबेल. ८ ऑक्टोबरपासून बुकींग सुविधा सुरू होणार आहे.