Pune News : पाचगणी : पाचगणी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत महामुलकर हे पोलिस खात्यातील तब्बल ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवापुर्तीच्या निमित्ताने पाचगणी पोलिस ठाण्याचे वतीने सहकुटुंब सत्कार करण्यात आला. Pune News
पाचगणी पोलिस ठाण्याचे वतीने सहकुटुंब सत्कार;
यशवंत महामुलकर यांच्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म झाला आहे. महामुलकर हे सन १९८७ मध्ये पोलीस शिपाई म्हणून सातारा जिल्हा पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी महाबळेश्वर, पाचगणी, वाई, भुईंज, लोणंद, खंडाळा व सातारा मुख्यालय आदी पोलीस ठाण्यात त प्रभावीपणे काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. Pune News
महामुलकर यांनी पोलीस शिपाई ते पोलीस फौजदार अशी सेवा करत कायमच पोलीस दलाची मान उंचावण्याकरिता प्रयत्नशील राहिले. त्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालक सन्मान पदका बरोबरच त्यांना वेळोवेळी २६० रिवाॅर्ड मिळाले आहेत. Pune News
दरम्यान, सहकारी पोलीस बांधव, वरिष्ठांशी व जनतेशी मनात कोणताही दुजाभाव न ठेवता सडेतोडपणे वागण्यात ते परिचित होते. सेवानिवृत्तीमुळे पाचगणी पोलीस ठाण्यात त्यांची कायम उणीव भासणार असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.