विशाल कदम
Pune News : पुणे “महिला सम्मान बचत पत्र” या विशेष मोहिमेचे खास गुंतवणुकीसाठी आयोजन करण्यात आले आहे. हि मोहीम पुणे जिल्ह्यात मंगळवार (ता.१८) ते गुरुवार (ता.२०) या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे जिल्हा (ग्रामीण) डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी ”पुणे प्राईम न्यूज”ला माहिती दिली आहे.(Pune News)
सदर योजना हि महिला व मुलींकरता उपलब्ध.
पुढे बोलताना एरंडे म्हणाले कि, “महिला सन्मान बचत पत्र” हि योजना दिनांक ०१ एप्रिल २०२३ पासून सर्व डाकघरामध्ये उपलब्ध आहे. सदर योजना हि महिला व मुलींकरता उपलब्ध असून त्याची मुदत २ वर्ष आहे. सदर बचत प्रत्रात कमीतकमी १ हजार रुपयापासून ते जास्तीतजास्त २ लाख (रु १०० च्या पटीत) गुंतवणूक करता येईल.(Pune News)
दरम्यान,एका महिलेच्या नावावर जास्तीतजास्त दोन लाखापर्यंत किती हि बचतपत्र घेता येतील पण दोन बचत पत्रामध्ये किमान तीन महिन्याचे अंतर असले पाहिजे. व्याजदर प्रती वर्षी ७.५% एवढा असून व्याज चक्रवाढ पद्धतीनी आकारले जाईल. सर्व महिलांनी व पालकांनी आपल्या मुलीच्या नावे सदर महिला सम्मान बचत पत्र घ्यावे.(Pune News)
मागील आर्थिक वर्षा मध्ये पुणे ग्रामीण विभागाअंतर्गत रुपये ३९६ मध्ये रुपये १० लाखांचे २५ हजार अपघाती विमा उतरवण्यात आले होते. तरी आता त्याची मुदत संपत आली आहे. त्यामुळे आपण आजच जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ३९६ रुपये वार्षिक हृत्यामध्ये १० लाखांचा अपघाती विमा पुनर्जीवित करून घ्यावा. तसेच डाक विभागाच्या सामान्य सेवा केंद्र मार्फत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीकाचा, केवळ एका रुपयामध्ये पीक विमा काढून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन एरंडे यांनी केले आहे.(Pune News)