Pune news : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. राज्यातील सत्तासमीकरणे बदलत आहेत. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजूनही साहेब की दादा… याच संभ्रमावस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) बाहेर दोन्ही नेत्यांना आवाहन करणारे बॅनर लावले गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनोमिलन व्हावे, अशी अपेक्षा या बॅनरमधून व्यक्त करण्यात आली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
“लहान तोंडी आज घेतो मोठा घास, महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस…” असे या फ्लेक्सवर लिहिले आहे. कार्यकर्त्यांच्या या आग्रहामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (व्हीएसआय) बैठकीनिमित्त एकत्र येणार होते. (Pune news) या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजय घुले यांनी हे बॅनर येथे लावले आहेत. “लहान तोंडी आज घेतो मोठा घास, महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस…” असे म्हणत दोन्ही नेत्यांचे मांजरी गावात सहर्ष स्वागत असल्याचे बॅनरवर लिहिले आहे. परंतु अजित पवार यांनी या बैठकीला येण्याचे टाळले. ते बैठकीला न येता दौंडच्या दिशेने रवाना झाले. या फ्लेक्सची चर्चा शहरात सुरु आहे.
दरम्यान, या बैठकीला अजित पवार यांची अनुपस्थिती होती. मात्र, शरद पवार यांच्या स्वागतासाठी अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील गेले होते. (Pune news) वळसे पाटील शरद पवार यांच्या स्वागतासाठी गेटवर गेले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील पुन्हा एकदा एकत्र आले. यामुळे देखील चर्चांना उधाण आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव काळात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद