पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune News) महसूल गुप्तचर विभागाच्या (एअर इंटेलिजन्स युनिट) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत सुमारे 74.50 लाख रुपये किमतीचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ (मारिजुआना) जप्त केला आहे. ही कारवाई 5 मार्च 2026 रोजी करण्यात आली.

अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बँकॉकहून पुण्याकडे येणाऱ्या ‘एअर इंडिया एक्सप्रेस’च्या (IX-241) विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान विमानातील लॅव्हेटरीमधील (स्वच्छतागृह) ‘टिश्यू कॅबिनेट’मध्ये दोन पिवळ्या रंगाचे फूड पॅकेट लपवलेले आढळून आले.
पॅकेट उघडून पाहिले असता, त्यामध्ये एकूण 8 व्हॅक्युम सीलबंद पाकिटांत 745 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा सापडला. आंतरराष्ट्रीय अवैध बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे 74.50 लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुढील तपास सुरू सदर अमली पदार्थ एनडीपीएस (NDPS) कायदा 1985 अंतर्गत जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हा माल बँकॉकवरून कोणाकडून पाठवण्यात आला आणि पुण्यात तो कोणासाठी ठेवला होता, याचा पुढील तपास अधिकारी करत आहेत.







