Pune News: पुणे: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड आणि महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन यांच्यात आळंदी परिसरात नवीन बस आगार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एसटी कडून चार एकर जमीन PMPL ला हस्तांतरण करण्यास मंजुरी मिळाली आहे.

हेही वाचा- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सिंचनासाठी शेतकऱ्यांना मिळणार ४०,००० अनुदान; अर्ज कसा करायचा? वाचा
निर्णयानुसार, ST ची मालकी असलेली एकूण आठ एकरांची जागा असून त्यापैकी चार एकर PMPL ला दिली जात आहेत. या जागेवर सुमारे 80 बसगाड्या थांबवण्याची सोय असलेले आगार बांधले जाणार आहे. या प्रकल्पामुळे आळंदी आणि आसपासच्या भागातील सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावी होईल, तसेच बस रॅपिंग, देखभाल आणि पार्किंगसंबंधी सुविधा सुलभ होतील.
स्थानिक वाहतूक, नागरिकांनी आणि प्रशासनाने या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या प्रकल्पाचे वेळापत्रक आणि खर्चाबाबतची माहिती सादर करू. विभागयी आयुक्त कार्यालयाकडून आवश्यक कागदपत्रांची मंजुरी, जागेच्या नकाशांची मान्यता आणि बांधकामाची सुरुवात केली जाईल. या आगामी प्रकल्पामुळे सुमारे 80 बसगाड्या थांबू शकतील, असे बांधकाम व्यवस्थेकडून नियजोन करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल.






