Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: खऱ्या जवानासमोर खोटं नाटक पडलं महागात! मृत सैनिकाचं आयकार्ड दाखवून शिवत होता गणवेश, असा झाला भांडाफोड

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 8 August 2026, 15:26

पुणे : हवाई दलातील जवान असल्याचे भासवून अधिकृत गणवेश शिवण्याचा एका तरुणाचा प्रयत्न ऐनवेळी उघडकीस आला. मृत जवानाच्या नावाने तयार केलेले बनावट ओळखपत्र घेऊन तो गणवेश शिवण्यासाठी टेलरच्या दुकानात पोहोचला होता. मात्र, त्याच वेळी तेथे आलेल्या एका खऱ्या हवाई दलाच्या जवानामुळे त्याचे बिंग फुटले.

ही घटना 6 जुलै रोजी लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीतील बालाजी टेलर्स येथे घडली. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी शुभम विलास अंबुरे (वय 26, रा. शिक्रापूर रस्ता, ता. शिरूर) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मूळचा बीड जिल्ह्यातील असून मागील 3 महिन्यांपासून शिक्रापूर परिसरातील एका सलूनमध्ये काम करत होता. त्याने 2022 मध्ये निधन झालेल्या हवाई दलातील जवान रजतकुमार मिश्रा यांच्या नावाचा वापर करून बनावट ओळखपत्र तयार केल्याचा आरोप आहे.

हे ओळखपत्र घेऊन शुभम बालाजी टेलर्समध्ये गेला आणि हवाई दलाचा गणवेश शिवण्याची ऑर्डर दिली. टेलर माप घेत असताना त्याच दुकानात हवाई दलाचे जवान ब्रिजेशकुमार मिश्रा आले. गणवेशासाठी दाखवलेले ओळखपत्र पाहून टेलरने ते ब्रिजेशकुमार यांना दाखवले.

 

ओळखपत्रावरील नाव पाहताच ब्रिजेशकुमार यांना संशय आला. संबंधित जवान रजतकुमार मिश्रा यांचे 2022 मध्ये निधन झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अधिक चौकशी केली असता शुभमकडे असलेले ओळखपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

ब्रिजेशकुमार यांनी तातडीने लोहगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दुकानात पोहोचून शुभम अंबुरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट ओळखपत्रही जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय 48) यांच्या तक्रारीवरून लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने बनावट ओळखपत्र तयार करण्यामागे नेमका काय उद्देश ठेवला होता, याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45

रक्षाबंधन सणासाठी आला पाहुणा अन् भीमा नदीत वाहून गेला; 3 दिवसांनंतर दौंड येथील भीमा नदी पात्रात सापडला मृतदेह

Tuesday, 1 September 2026, 17:43
Next Post

सिद्धिविनायक मंदिर घोटाळ्याची आता थेट चौकशी! मुख्यमंत्र्यांचा आदेश; ‘त्या’ प्रकरणातील सगळं सत्य बाहेर येणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp