Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रक्षाबंधन सणासाठी आला पाहुणा अन् भीमा नदीत वाहून गेला; 3 दिवसांनंतर दौंड येथील भीमा नदी पात्रात सापडला मृतदेह

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 1 September 2026, 17:43

दौंड, (पुणे) : रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी नातलगांकडे आलेल्या तरुणांपैकी एका 18 वर्षीय तरुणाचा भीमा नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मासेमारी करताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर सोमवारी (ता. 31) भीमा नदी पात्रातील नवीन ब्रिजजवळील महादेव मंदिरासमोर आढळून आला.

राजकुमार फुलसिंग यादव (वय 18, सध्या रा. सारोळा रेल्वे स्टेशनजवळ, ता. जि. अहिल्यानगर; मूळ रा. चंद्राणी माळ, ता. समनापूर, जि. दिंडोरी, मध्य प्रदेश) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. याबाबत मुकेश कुमार दुर्वे (वय -18, व्यवसाय मजुरी सध्या राहणार दौंड रेल्वे स्टेशन बंगला साईट कडील पार्किंग जवळील मोकळ्या जागेत ताडपत्रीच्या झोपड्या मध्ये दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे. मूळ राहणार चंद्रानी माळ तालुका समनापुर जिल्हा दिंडोरी राज्य मध्य प्रदेश) यांनी खबर दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील सारोळा येथून 13 जण दौंड रेल्वे स्टेशन परिसरातील ताडपत्रीच्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या आपल्या नातलगांकडे आले होते. सणाचा आनंद साजरा केल्यानंतर, 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सर्वजण पानसरे वस्ती येथील भीमा नदीच्या किनाऱ्यावर आंघोळीसाठी व मासेमारीसाठी गेले होते. नदीत पोहत असताना राजकुमार यादव, रामा दुर्वे, कमलेश पट्टा आणि विजय दुर्वे हे चौघे जण नदीच्या मध्यभागी असलेल्या खडकावर जाऊन गळाने मासे पकडत होते.

मासेमारी सुरू असतानाच राजकुमार यादव याने खडकावरून अचानक नदीच्या पात्रात उडी मारली. मात्र, भीमा नदी पात्रात पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने तो पाण्याच्या वेगासोबत वाहून जाऊ लागला. त्याला वाहून जाताना पाहून खडकावर असलेल्या विजय, कमलेश आणि रामा या तिघांनीही त्याला वाचवण्यासाठी तत्काळ नदीत उड्या घेतल्या.

 

मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने ते तिघेही प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले व त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. सुदैवाने, तेथे मासेमारी करणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीने प्रसंगावधान राखून नदीत उडी घेतली आणि रामा, कमलेश व विजय या तिघांना सुखरूप बाहेर काढले. परंतु, राजकुमार यादव हा पाण्याच्या वेगात दृष्टीआड झाला. घटना घडताच नातेवाइकांनी डायल 112 वर पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, दौंड पोलीस, स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. दौंड पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करून रेस्क्यू टीमच्या मदतीने नदी पात्रात शोध सुरू होता. अखेर सोमवारी (ता. 31) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भीमा नदी पात्रातील नवीन ब्रिजसमोरील महादेव मंदिराच्या मोकळ्या पात्रात राजकुमार याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवली व दौंड उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. घटनेचा पुढील तपास पोलीस शिपाई लवटे करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58

‘ओल्ड मंक’ प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

Wednesday, 2 September 2026, 19:16

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55
Next Post

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp