Thursday, June 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाडामुळे पुणे दौंड डेमो पडली बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 21 May 2026, 22:30

पुणे: पुणे-दौंड लोहमार्गावरील लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाडामुळे डेमो ट्रेन एक तासाहून अधिक काळ ठप्प राहिल्याने शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली असून रोज कामासाठी प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि महिला प्रवासी मोठ्या अडचणीत सापडले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-दौंड डेमो ट्रेन लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर तांत्रिक कारणामुळे अचानक बंद पडली. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेच्या एका डब्याचे ब्रेक जाम झाल्याने गाडी पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळे ट्रेन दीर्घकाळ स्थानकावरच थांबून राहिली.

 

या बिघाडामुळे शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये आणि स्थानकावर अडकून पडले. विशेषतः रोज कामावरून घरी परतणारे नोकरदार, विद्यार्थी आणि महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. रात्री उशीर होत असल्याने अनेक महिला प्रवाशांमध्ये अस्वस्थता आणि चिंता निर्माण झाली.

काही प्रवाशांनी रेल्वेची प्रतीक्षा न करता पुणे-सोलापूर महामार्गाचा वापर करून बस आणि इतर वाहनांचा पर्याय स्वीकारला. मात्र अनेक जणांना एक तासाहून अधिक काळ कोणतीही स्पष्ट माहिती किंवा पर्यायी व्यवस्था न मिळाल्याने स्थानकावरच थांबावे लागले.

प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर गंभीर नाराजी व्यक्त करत, पुण्याहून डेमो गाडी सुटण्यापूर्वी तिची तांत्रिक तपासणी आणि फिटनेस तपासणे आवश्यक होते, असा सवाल उपस्थित केला आहे. अवघ्या तिसऱ्याच स्थानकावर गाडी बंद पडल्याने देखभाल आणि तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासाठी रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या घटनेमुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून रेल्वे प्रशासनाच्या नियोजन आणि कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची धास्ती! पोलिसांचा ‘डिजिटल पहारा’; 21 कॅमेऱ्यांमधून ठेवणार हालचालींवर लक्ष

Wednesday, 10 June 2026, 22:59

सांगली पालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 90 दिवसांपासून गायब असलेल्या 37 कर्मचाऱ्यांचे निलंबन; आयुक्तांच्या धडक कारवाईने खळबळ

Wednesday, 10 June 2026, 22:24

काळाचा क्रूर घाला! मामाच्या गावी निघालेली भावंडं घरी परतलीच नाहीत; एकाच अपघातात तिन्ही भावंडांचा बळी

Wednesday, 10 June 2026, 21:42

नवले पुलाखाली भीषण अपघात! भरधाव सिमेंट टँकर उलटून डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

Wednesday, 10 June 2026, 21:00

पुण्यात साडेचौदा वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिला! पती आणि नातेवाईकांविरोधात खराडी पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 10 June 2026, 20:18

“मी साधा माणूस, तुम्ही मोठी माणसं”; दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांशी ‘मस्करी’? ‘त्या’ एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

Wednesday, 10 June 2026, 19:38
Next Post

विकास लवांडेंची अटक म्हणजे लोकशाहीचा खून! पोलिसांवर सरकारच्या दबावाचा शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.