Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: प्रवाशाकडे लाखो रुपये असल्याचे कळले अन् रिक्षाचालकाने केले धक्कादायक कृत्य; सत्य समोर आल्यानंतर अनेकांना बसला धक्का

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 24 September 2025, 9:46

पुणे: पुण्यात एका अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मुळशी (Pune Crime) तालुक्यात फेकणाऱ्या रिक्षाचालकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने पैशाच्या लालसेपोटी हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आणि पौड पोलिस पुणे ग्रामीण यांनी संयुक्तपणे केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी पौड पोलीस स्टेशन हद्दीतील घोटावडे गावात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, तसेच त्याच्या गळ्यावर आणि डोक्यावर जखमा होत्या. या घटनेनंतर, पोलिसांनी तत्काळ गुन्हा (गु.र.नं. 252/2025) दाखल करून तपास सुरू केला.

घटनास्थळी सापडलेल्या आधार कार्डच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटली. मृत व्यक्तीचे नाव आशुतोष मनोहर वैशंपायन (वय 47, रा. पवई, मुंबई) असे होते. त्यांच्या पत्नी सौ. अक्षदा वैशंपायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष हे 4 सप्टेंबर 2025 रोजी लखनौहून पुण्यात आले होते.

सीसीटीव्ही फुटेज आणि रिक्षाचालकाची ओळख

पुणे पोलिसांनी तांत्रिक तपास करत पुणे रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.  तपासात, आशुतोष यांनी पुणे स्टेशनवरून रिक्षा पकडून स्वारगेट गाठल्याचे आणि तेथून दुसऱ्या रिक्षाने सिंहगड रोडकडे गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रिक्षाचालकाचा शोध घेतला. रिक्षाचालकाचे नाव सचिन प्रकाश जाधव (वय 41, रा. धनकवडी, पुणे) असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी 20 सप्टेंबर 2025 रोजी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पैशांच्या लालसेपोटी खून

चौकशीदरम्यान, आरोपी सचिन जाधवने गुन्हा कबूल केला असून त्याने सांगितले की, आशुतोष वैशंपायन हे स्वारगेटहून त्याच्या रिक्षामध्ये बसले होते आणि ते दारूच्या नशेत होते. त्यांच्या एटीएम कार्डमध्ये लाखो रुपये असल्याचे कळल्यावर पैशांच्या लालसेपोटी आशुतोष यांचा खून केला आणि त्यांचा मृतदेह घोटावडे गावात फेकून दिला.

आरोपीवर कलम 302, 34, 379, 411अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातही त्याच्यावर यापूर्वी 13 जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 25 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांची कामगिरी

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अविनाश शिळीमकर, पौड पोलीस स्टेशनचे संतोष गिरीगोसावी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पौड पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15
Next Post

Shirur News: शिरूर येथील अमोल ज्वेलर्सवर पहाटे दरोडा; लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp