Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुण्यात खळबळ! कोट्यवधींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात माजी मंत्र्याला अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 March 2026, 16:26

Pune Crime : पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी आर्थिक फसवणुकीच्या मोठ्या प्रकरणात कारवाई करत भाजपशी संबंधित माजी मंत्री शेखर चरेगावकर (Shekhar charegaonkar ) यांना अटक केली आहे. रिसॉर्ट व्यवस्थापनाच्या व्यवसायातून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक ( financial fraud case) केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच यशवंत सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचाही आरोप समोर आला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात चिखली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश भगवानदार गुप्ता, संतोष पवार, वनिता पवार, श्रीपदा कुलकर्णी, रोहित लभडे, सुरेंद्र काळे आणि सुमित घोडके यांच्याविरोधातही भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप रामचंद्र चोरघे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार 5 मार्च 2024 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

 

तक्रारीनुसार, गुंतवणूक योजनेअंतर्गत सुमारे 8 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र त्यापैकी सुमारे 6.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करत चरेगावकर यांना अटक केली. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, चरेगावकर यांच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप झाले होते. मागील वर्षी कराड पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर यशवंत बँकेत सुमारे 112 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच अंमलबजावणी संचालनालयानेही त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यानुसार कलमे लावण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40
Next Post
Ashok Kharat

Ashok Kharat : ज्यांच्याकडे महिलांच्या सुरक्षेची धुरा, त्या रुपाली चाकणकर भोंदूबाबाच्या आहारी? रुपाली चाकणकरांचे फोटो व्हायरल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.