बापू मुळीक
पुरंदर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी वर्षभरात एकूण ६ वेळा आमरण उपोषण केले आहे. वेळोवेळी सरकारने फसवे आश्वासन देऊन मराठा आंदोलनाच्या प्रश्नाला बगल दिली आहे. त्यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण लढ्याला पुरंदर तालुक्यातून सर्व समाजातुन पाठिंबा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सगे सोयरे सहित ओबीसीमधून सरसकट आरक्षणामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीचा प्रश्न अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रलंबित ठेवला आहे.
या मागणी करता अनेक वेळा महाराष्ट्र शासनाकडून खोटी आश्वासने देऊन मराठा समाजाची दिशाभूल व फसवणूक केली गेली आहे. या मागणी करता अंतरवली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील हे गेल्या नऊ दिवसापासून उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे पाटील यांची प्रकृती खूप खालावली व सलाईन लावून उपोषण करणे हे त्यांच्या मनाला पटले नाही. तसेच महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या भावना लक्षात घेऊन आमरण उपोषण 25 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता स्थगित केले. परंतु सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची कसलीही दखल न घेतल्यामुळे तसेच सरकारच्या वतीने कोणीही या उपोषणास हजेरी लावली नाही. यामुळे सरकारचा जाहीर निषेध संपूर्ण पुरंदर तालुक्याच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. संपूर्ण पुरंदर तालुक्याच्या वतीने 100% सर्व आस्थापना समाजाने बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदवला. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे पुरंदरवासीयांनी केली आहे. मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावली नाही. यामुळे संपूर्ण पुरंदर तालुक्याच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
संपूर्ण पुरंदर तालुक्याच्या वतीने 100% सर्व आस्थापना समाजाने बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदवला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे पुरंदरवासीयांनी केली आहे. मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा यासाठी तहसीलदार यांना मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पुरंदर तालुक्यातीक मराठा आरक्षण प्रश्नाला मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले आहे. यावेळी पुरंदर तालुक्यातून प्रत्येक गावातून मराठा बांधव मोठ्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित होता.