Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चाहूल लागताच जुगारी शेतातून पसार

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 5 June 2026, 11:48

लोणी काळभोर, ता. 5 : थेऊर फाटा परिसरातील नयन बार हॉटेलजवळ सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी गुरुवारी (ता. 4) दुपारी दोनच्या सुमारास छापा टाकला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणारे आणि जुगार चालविणारे इसम घटनास्थळावरून शेतातून पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास कांबळे व रमेश तुपे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन भिमराव सोनवणे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांना गोपनीय माहितीदारामार्फत थेऊर फाटा येथील नयन बार हॉटेलजवळ पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अवैध जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक पंचांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची खात्री करून दुपारी दोनच्या सुमारास छापा टाकला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणारे इसम जुगाराचे साहित्य जागेवरच टाकून जवळील मोकळ्या शेतातून पसार झाले. घटनास्थळी पाहणी केली असता ‘सोरट पंती पाकुळी’ या प्रकारच्या जुगारासाठी वापरण्यात येणारा चार्ट आणि दोन लोखंडी कॉईन असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी ते पंचांसमक्ष जप्त करून सीलबंद केले.

 

पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता, हा जुगार अड्डा विकास कांबळे हा चालवत असून ज्या जागेवर जुगार सुरू होता ती जागा रमेश तुपे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post

भारताने जुन्या काळात अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही पैसे वसूल करतोय- ट्रम्प

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.