Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये ‘मॅगी-अंडाभुर्जी’ गाड्यांवर पोलिसांचा धडाका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 23 May 2026, 18:02

लोणी काळभोर, ता. २३ : पुणे–सोलापूर महामार्गावर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या अनधिकृत अंडाभुर्जी व मॅगी गाड्यांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून, नागरिकांच्या जीवितालाच धोका निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलिसांनी २० मे रोजी मध्यरात्री धडक कारवाई करत दोन गाडे चालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे महामार्गालगत सुरू असलेल्या अनधिकृत खाद्य व्यवसायांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अन्नासाहेब जालिंदर सालगुडे (वय ३६, मूळ रा. सालसे, ता. करमाळा, जि. सोलापूर) व लिंगराज बिरप्पा होनपाखरे (वय २१, मूळ रा. उत्तर सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांचे पथक २० मे रोजी मध्यरात्री रात्रगस्त व पेट्रोलिंग ड्युटीवर होते. यावेळी माळीमळा परिसरातील पुणे–सोलापूर महामार्गावर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात गर्दी करून अंडाभुर्जी व मॅगीचे गाडे सुरू असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी प्रथम जॉयनेस्ट सोसायटीजवळ कारवाई केली. येथे अन्नासाहेब सालगुडे हा रस्त्याच्या कडेला अंडाभुर्जीचा गाडा उभारून व्यवसाय करत होता. या गाड्यामुळे महामार्गावरील वाहतूक धोकादायक पद्धतीने मंदावत होती. ग्राहकांची गर्दी थेट रस्त्यावर होत असल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

 

यानंतर काही अंतरावर श्री गणेश वॉशिंग सेंटरजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. येथे लिंगराज बिरप्पा होनपाखरे हा मॅगी व अंडाभुर्जीचा गाडा चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्याही गाड्यामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने त्याच्यावरही भारतीय न्याय संहिता कलम २८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हि कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकूश बोराटे, पोलीस हवालदार संतोष बारगाजे, चंद्रकांत माने पोलीस अंमलदार दिपक अर्जुन गायकवाड, हनुमंत शिवराम शिंगाडे व महिला पोलीस रुपाली कदम यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38
Next Post

कदमवाकवस्तीतील पार्किंगमध्ये रंगला ‘रम्मी’चा डाव; लोणी काळभोर पोलिसांची धाड, तिघांना पकडले रंगेहाथ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.